मेहकर येथील पैनगंगा नगरात राहणारे सलीम शाह, शाहीद शाह सलीम शाह यांच्यात पत्नीसोबत घरगुती वाद सुरू होता. हा वाद शेजारी राहणारे आसीफशाह मकबुल शाह (३०) हे सोडविण्यासाठी गेले असता, आरोपी सलीम शाह, शाहीद शाह सलीम शाह (दोन्ही रा. पैनगंगा नगर, मोळा रोड) यांनी भांडण सोडविल्याच्या कारणावरून आरोपी सलीम शाह याने आसीफशाह मकबुल शाह यांंना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. तसेच आरोपी शाहीद शाह सलीम शाह याने त्यांना धरून ठेवले व सलीम शाह याने आसीफशाह मकबुल शाह यांचे वडील व भावास शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एकावर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:40 IST