शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

आश्रम शाळेतील शिक्षकांचा संसार आर्थिक तडजोडीवर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 17:55 IST

आश्रम शाळेतील शिक्षकांचा संसाराचा गाडा आर्थिक तडजोडीवर चालत असल्याचे वास्तव शिक्षक दिनाच्या पूर्वसंधेला समोर आले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २० टक्के अनुदानीत शाळेवरील शिक्षकांनाही वेतनासाठी असाच संघर्ष करावा लागला होता.आश्रमशाळेवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या वेतनामध्ये अनियमीतता दिसून येते.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्ह्यात २४ शाळा सुरू आहेत. मात्र समाजकल्याण कार्यालयाकडून या शाळेवरील शिक्षकशिक्षकेतर कर्मचाºयांना वेळेवर वेतन दिल्या जात नाही. त्यामुळे आश्रम शाळेतील शिक्षकांचा संसाराचा गाडा आर्थिक तडजोडीवर चालत असल्याचे वास्तव शिक्षक दिनाच्या पूर्वसंधेला समोर आले. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील २० टक्के अनुदानीत शाळेवरील शिक्षकांनाही वेतनासाठी असाच संघर्ष करावा लागला होता.विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावरून अनेक प्रयत्न होताना दिसून येतात. जिल्ह्यात विमुक्त जाती भटक्या जमातीच्या २४ शाळा असून त्यामध्ये प्राथमिक शाळा १४, माध्यमिक आठ व उच्च माध्यमिक दोन शाळांचा समावेश आहे. या आश्रमशाळांवर कार्य करणाºया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन हे सामाजिक न्याय विभागांतर्गत होते. वेतनासाठी मुबलक अनुदान नसेल तर वजा रकमेमधून वेतन करावे व १ तारखेलाच वेतन मिळावे, असे आदेश आहेत. मात्र तरीसुद्धा बिल पास न होणे, तांत्रिक अडचणींचा खोडा यासारख्या कारणांमुळे आश्रमशाळेवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या वेतनामध्ये अनियमीतता दिसून येते. नियमीत वेतन होत नसल्याने अनेक शिक्षकांचे अर्थचक्र बिघडते.  मुख्यध्यापक वेतन देयक दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत समाजकल्याण कार्यालयात सादर करतात. त्यानंतर ते वेतन देयक ट्रेझरीकडे पाठविण्यात येते. यासर्व प्रक्रियेवर जवळपास एक महिन्याचा कालावधी जातो. त्यातही जर देयक त्रुटीत निघाले तर ते परत समाजकल्याणमध्ये येते. त्यानंतर पुन्हा दहा ते १५ दिवस जातात. यासर्व दिरंगाईमध्ये आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन दोन महिने होऊनही प्रतीक्षेतच राहते. सध्या जुलै व आॅगस्ट महिन्याचे वेतन थकल्याने शिक्षकांना सण उत्सवाच्या दिवसामध्ये आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्याची माहती एका शिक्षकाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. शिक्षकांचा वेतनासाठी संघर्ष५ सप्टेंबर रोजी असलेल्या  शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या समस्यांवर प्रकाश टाकला असता वेतनाची समस्या यामध्ये प्रकर्षाने समोर आली. सर्व शिक्षकांचे वेतन आॅनलाइन करण्यात आलेले असतानाही विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळा, २० टक्के अनुदानीत शाळा व इतर काही खाजगी शाळेवरील शिक्षकांना वेतनासाठी अनेक वेळा प्रतीक्षा करावी लागत  आहे. २० टक्के अनुदानीत शाळेवरील शिक्षकांची अडचणजिल्ह्यातील २० टक्के अनुदानीत शाळांवरील काही शिक्षकांना शालार्थ प्रणालीच्या तांत्रिक अडचणींमुळे वेतनासाठी प्रतीक्षा कारावी लागली होती. २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षातील सुमारे ११ महिन्यांचे वेतन थकले होते. त्यामुळे या शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, मागील महिन्यात या शिक्षकांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागला. 

आश्रमशाळेवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन वेळेवर करण्याचा प्रयत्न असतो. परंतू यावेळेस काही तांत्रिक अडचणीमुळे वेतनास विलंब झाला होता. वेतनाचे बिल पास झाले असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या खात्यावर जमा होत आहे. - मनोज मेरत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी. बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाTeacherशिक्षक