दारू पिण्यावरून वाद, मुलाने केली बापाची हत्या; मंडपगाव येथील घटना
By संदीप वानखेडे | Updated: June 9, 2023 16:07 IST2023-06-09T16:06:32+5:302023-06-09T16:07:02+5:30
याप्रकरणी अंढेरा पाेलिसांनी ८ जून राेजी रात्री अल्पवयीन आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दारू पिण्यावरून वाद, मुलाने केली बापाची हत्या; मंडपगाव येथील घटना
देऊळगाव राजा : दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मुलाने बापाची हत्या केली. ही घटना अंढेरा पाेलिस स्टेशन अंतर्गत नवीन मंडपगाव येथे ५ जून राेजी घडली. याप्रकरणी अंढेरा पाेलिसांनी ८ जून राेजी रात्री अल्पवयीन आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंढेरा पाेलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवीन मंडपगाव येथे राजू लालमन पेंढारकर व गणेश राजू पेंढारकर या बापलेकांमध्ये ५ जून राेजी दारू पिण्यावरून वाद झाला. या वादात गणेश पेंढारकर याने राजू पेंढारकर यांच्या डाेक्यावर मूर्ती मारून जखमी केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राजू पेंढारकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गणेश भिकाजी उचांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी गणेश पेंढारकर याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंढेरा पाेलिस करीत आहेत.