रब्बीचे क्षेत्र वाढले; सिंचनाची सोय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 02:23 PM2019-12-09T14:23:49+5:302019-12-09T14:23:57+5:30

शेतकºयांच्या शेतात हरभरा बहरला आहे; परंतु पिकाला पाणी देण्यासाठी प्रकल्पांमधून पाणी अद्याप सोडण्यात आलेले नाही.

The area of the rabbi increased; No irrigation facility! | रब्बीचे क्षेत्र वाढले; सिंचनाची सोय नाही!

रब्बीचे क्षेत्र वाढले; सिंचनाची सोय नाही!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : यावर्षी सगळीकडेच प्रचंड पाऊस पडल्याने खामगाव तालुक्यात रब्बीचे क्षेत्र वाढले, मात्र पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुविधा मिळताना दिसत नाही. एकीकडे प्रकल्पांमध्ये पाणी आहे, मात्र अद्याप शेतापर्यंत पोहचले नसल्याचे दिसून येते. सिंचनासाठी पाण्यासोबतच वीजेचाही प्रश्न आहे. रात्रीच्या वेळी वीज सुरू राहत असल्याने शेतकऱ्यांना थंडीत ओलीत करावे लागते. महावितरणने दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.
गत काही वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत नसल्याने खामगाव परिसरातील सर्वच प्रकल्पांमधील पाणी पातळी घटली होती. जिथे पिण्याच्या पाण्याचीच टंचाई आहे; तिथे सिंचनाला पाणी मिळणे कठीण होऊन बसले होते. मात्र यावर्षी सगळीकडेच प्रचंड पाऊस पडला, त्यामुळे सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. खामगाव तालुक्यातील पावसाची सरासरी ६४० मिलीमिटर एवढी आहे. परंतु गत काही वर्षांपासून केवळ निम्मेच पाऊस पडत होता. यावर्षी मात्र ८२४ मिलीमीटर एवढा म्हणजेच तब्बल दीडपट पाऊस पडला. परिणामी यावर्षी पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न मिटला. परंतु शेतकºयांच्या बांधापर्यंत अजुनपर्यंत पाणी पोहचलेले दिसत नाही. खामगाव तालुक्यात यावर्षी रब्बीचा पेरा वाढला आहे. सुमारे २८ हजार हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यात हरभरा, गहू, कांदा, व मका पिकांचा समावेश आहे. यावर्षी विहीरींचीही पाणी पातळी बºयापैकी वाढल्याने सर्वच पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात हरभरा बहरला आहे. परंतु पिकाला पाणी देण्यासाठी प्रकल्पांमधून पाणी अद्याप सोडण्यात आलेले नाही.
पाटचºयांची स्वच्छता, दुरूस्तीची कामे प्रलंबित असल्यामुळे शेतकºयांच्या शेतापर्यंत पाणी पोहचू शकलेले नाही. खामगाव तालुक्यात मन आणि मस या प्रकल्पांमधून शेतकºयांच्या शेतापर्यंत पाटचºयांद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था आहे. तर तोरणा व ज्ञानगंगा प्रकल्पातून नदी पात्रात पाणी सोडण्यात येते. यानंतर शेतकरी नदीत मोटारी बसवून पाण्याचा उपसा करतात. दरम्यान मन व मस या प्रकल्पातून आतापर्यंत पाटचºयांद्वारे पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे रब्बीच्या पिकांसाठी पाणी मिळत नसल्याचे दिसून येते. सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांच्या शेतापर्यंत पाणी सोडण्याची त्वरीत व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.
 
वीज उपलब्ध करून द्या!

एकीकडे प्रकल्पांमधून शेतापर्यंत पाणी पोहचले नाही, तर दुसरीकडे वीजेचीही समस्या आहे. अनेक भागात केवळ रात्रीच वीज पुरवठा सुरू करण्यात येत असल्याने शेतकºयांना रात्री थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. दुसरीकडे काही भागातील विद्यूत रोहित्रांचा प्रश्न आहे. काही रोहित्र बंद आहेत, तर काही ठिकाणी अतिशय कमी दाबाने विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शेतकºयांना रात्री ऐवजी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी तसेच रोहित्रांचाही प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: The area of the rabbi increased; No irrigation facility!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.