शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पोफळी येथील मियावाकी प्रकल्पाचे केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST

पोफळी येथील मियावाकी प्रकल्पाचे केले कौतुक : समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन धामणगाव बढे : पाणी फाउंडेशनचे सीईओ ...

पोफळी येथील मियावाकी प्रकल्पाचे केले कौतुक : समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

धामणगाव बढे : पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांनी मोताळा तालुक्यातील विविध गावांमध्ये २ फेब्रुवारी राेजी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी हाेण्याचे आवाहन केले.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत मोताळा तालुक्यातील अनेक गावांनी चांगली कामगिरी केली. आता पाणी फाउंडेशन समृद्ध गाव स्पर्धेच्या निमित्ताने पुढचे पाऊल टाकले आहे. गावांचा शाश्‍वत विकास या स्पर्धेची मूळ संकल्पना आहे. यासाठी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सत्यजित भटकळ यांनी केले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अंतर्गत पोफळी येथे मियावाॅकी जंगल प्रकल्प साकारण्यात आला होता. त्याची पाहणी सत्यजित भटकळ यांनी केली. संपूर्ण विदर्भातील हा एकमेव प्रकल्प असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. मोताळा तालुक्यातील उर्हा, सिंदखेड, शेलापूर या गावांना त्यांनी भेटी दिल्या. सिंदखेड येथे आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील जनुना, तिघरा, उबाळखेड, दाभा, कोऱ्हाळा बाजार, सिंदखेड येथील जल मित्रांसोबत त्यानीं संवाद साधला. सिंदखेड येथे शिवार फेरी, जलसंधारणाची कामे याविषयी माहिती घेतली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमुळे आनंद, पाणी व आत्मविश्वास मिळाला. ती फक्त सुरुवात होती अजून पुढे मोठे काम करायचे बाकी आहे. जनसहभाग व जनआंदोलनामुळे शक्य आहे, असे भटकळ यांनी सांगितले. प्रत्येक ठिकाणी गावकऱ्यांनी भटकळ यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले. सिंदखेड येथील कामाची माहिती प्रवीण कदम यांनी दिली. मोताळा तालुक्यातील २० गावांनी समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. यावेळी पाणी फाउंडेशनचे खान्देश समन्वयक सुखदेव भुसारी, विदर्भ समन्वयक सुभाष नानवटे, मोताळा तालुका समन्वयक ब्रह्मदेव गिऱ्हे, तांत्रिक समन्वयक सुमित गोरले, प्रभाग समन्वयक सचिन बोरसे, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक संदीप जाधव उपस्थित होते.