प्रभाकर वखरे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:31 IST2021-03-07T04:31:50+5:302021-03-07T04:31:50+5:30

कलेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या प्रभाकर वखरे यांना यापूर्वीही राज्यस्तरीय कलागौरव, कलारत्न पुरस्कारासह विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ...

Appointment of Prabhakar Vakhre as District President | प्रभाकर वखरे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

प्रभाकर वखरे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

कलेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या प्रभाकर वखरे यांना यापूर्वीही राज्यस्तरीय कलागौरव, कलारत्न पुरस्कारासह विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जालना येथील समता बुद्ध विहार येथे झालेल्या कार्यक्रमात प्रभाकर महाराज सुरासे यांच्या उपस्थितीत त्यांची निवड करण्यात आली. तसेच बुलडाणा जिल्हा उपाध्यक्षपदी भूषण कहाळे, महासचिवपदी अमर जाधव, सहसचिव तानाजी शिनगारे, सल्लागार ज्ञानेश्वर ससाणे, कोषाध्यक्ष विष्णू महाराज राऊत, सहकोशाध्यक्ष रामभाऊ साळवे, संपर्क प्रमुख सचिन महाराज केकान यांचीही निवड करण्यात आली. याच कार्यक्रमात जालना जिल्ह्यातील दामिनी पथक प्रमुख सहायक पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांचा राजस्थान येथील जयपूर शहरात झालेल्या सौंदर्य स्पर्धेत निवड झाल्याबद्दल उपस्थित कलाकारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Appointment of Prabhakar Vakhre as District President