खामगाव तालुक्यात अंगणवाडी सेविकेची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:16 IST2018-04-13T01:16:16+5:302018-04-13T01:16:16+5:30

खामगाव : राहत्या घरात ३८ वर्षीय अंगणवाडी सेविकेने गफळास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील किन्ही महादेव येथे १२ एप्रिल रोजी उघडकीस आली.

Anganwadi worker suicides in Khamgaon taluka | खामगाव तालुक्यात अंगणवाडी सेविकेची आत्महत्या 

खामगाव तालुक्यात अंगणवाडी सेविकेची आत्महत्या 

ठळक मुद्देदोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन केली आत्महत्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राहत्या घरात ३८ वर्षीय अंगणवाडी सेविकेने गफळास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील किन्ही महादेव येथे १२ एप्रिल रोजी उघडकीस आली. ज्योती राजेश बोचरे ही महिला अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. बुधवारी रात्री तिने राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी येथील सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. सदर अंगणवाडी सेविकेने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समजू शकले नाही. 

Web Title: Anganwadi worker suicides in Khamgaon taluka