बुलडाणा जिल्ह्यात ३६ टक्के पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 14:00 IST2019-08-16T14:00:20+5:302019-08-16T14:00:27+5:30
बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार ७१९ शेतकऱ्यांना २८९ कोटी ७३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात ३६ टक्के पीक कर्ज वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पीक कर्ज वाटपाचा टक्का सुधारण्याच्या दृष्टीने जिल्हा अग्रणी बँकेने पावले टाकली असून १२ दिवसात दहा टक्क्यांनी पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार ७१९ शेतकऱ्यांना २८९ कोटी ७३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
दुसरीकडे ३० सप्टेंबर २०१९ ही खरीपाचे पीक कर्ज वाटपाची अंतिम मुदत आहे. त्यामुळे येत्या दीड महिन्यात पीक कर्ज वाटपाची मोठी कसरत जिल्हा अग्रणी बँकेला करावी लागणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात तीन लाख ३३ हजार ९६५ शेतकऱ्यांना यावर्षी एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. त्यापैकी एक लाख १५ हजार ६४२ शेतकरी पीक कर्जासाठी सध्या पात्र आहेत. जिल्ह्याचा वार्षिक पतआराखडा हा प्रामुख्याने कृषी क्षेत्रामध्ये अधिक तरतूद करणार आहे. औद्योगिक दृष्ट्या जिल्हा डी प्लसमध्ये असल्याने प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर जिल्हयाची मदार आहे. त्यातच जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची दोलायमान आर्थिक स्थिती पाहता जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, व्यापारी तथा सर्वाजनिक क्षेत्रातील बँकांवरच २०१३ पासून कृषी क्षेत्रामध्ये पीक कर्ज वाटपाची मदार येऊन ठेपली आहे. नाही म्हणायला जिल्हयात पतसंस्थांचे मोठे जाळे असून जिल्हयाच्या अर्थकारणात या पतसंस्थांचा जवळपास ७१ टक्के वाटा आहे तर राष्ट्रीयकृत, व्यापारी आणि ग्रामीण बँकांचा वाटा हा २९ टक्क्यांच्या आसापास आहे.
त्यातच जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची एकंदरीत स्थिती काहीशी बिकट असल्याने प्रामुख्याने मोठ्या बँकांवरच पीक कर्जासाठी शेतकºयांची मदार आहे.
ही बाब पाहता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आतापर्यंत जिल्ह्यातील २४ हजार ३४९ शेतकºयांना तब्बल १७९ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. वास्तविक जिल्हयातील पीक कर्जाची गरज असलेल्या शेतकºयांचा विचार करता या क्षेत्रातील बँकांना दोन लाख ६६ हजार ५२७ शेतकºयांना पीक कर्ज देण्याचे उदिष्ट आहे. पैकी प्रत्यक्षात पीक कर्जासाठी ६५ हजार १२५ शेतकरी पात्र ठरलेले असून त्यापैकी ३७ टक्के शेतकºयांना सार्वजनिक क्षेत्रातील या बँकांनी पीक कर्ज दिले आहे. दरम्यान, अद्यापही पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
व्यापारी बँकांचे ४७ कोटी वाटप
पात्र शेतकºयांपैकी दोन हजार ७८१ शेतकºयांना व्यापारी बँकांनी ४६ कोटी ८० लाख ११ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. एकूण शेतकºयांपैकी या बँकांना २६ हजार ७६६ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. दरम्यान, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने चार हजार ३९४ शेतकºयांना ३६ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असून त्याची टक्केवारी ही १३ टक्के जाते.
जिल्हा बँकेचे वाटप ५६ टक्के
४जिल्हा बँकेने पाच हजार १९५ शेतकºयांना २६ कोटी ५७ लाख ४१ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्याची टक्केवारी ही ५६ टक्के जाते. या बँकेला नऊ हजार ४५० शेतकºयांना ४७ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. आर्थिक दृष्ट्या फारशी सक्षम नसलेल्या या बँकेने आतापर्यंत पीक कर्ज वाटपाचा टक्का बºयाबैकी वाढता ठरवीला आहे.