बुलडाणा : अल्पवयीन मुलीच्या लैंगीक शोषण प्रकरणी शिक्षक कॉलनी धामणदरी परिसरातील एका आरोपीस न्यायालाने २0 जानेवारी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.बुलडाणा शहर पोलिस स्टेशनअंतर्गंत येणार्या शिक्षक कॉलनी धामणदरी परिसरातील आरोपी प्रशांत ठेंग (वय २५) याने वर्षभरापासून एका अल्पवयीन मुलीचे लैंगीक शोषण केले. तसेच तिचे आक्षेपार्ह फोटोही काढले. याप्रकरणी कोणाला काही सांगितल्यास आरोपीने या मुलीस मारहाण केली. तसेच तिच्या पालकांना जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सदर मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द १८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी आरोपी प्रशांत ठेंग यास अटक केली. सदर आरोपीस आज न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे. याप्रकरणी अधिक तपास ठाणेदार तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कालावधी संपलेल्या गोळय़ांचे रुग्णांना वाटप
By admin | Updated: January 20, 2015 23:21 IST
देऊळगांवराजा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार.
कालावधी संपलेल्या गोळय़ांचे रुग्णांना वाटप
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}