शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनीची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 12:06 PM

Akola Sports Academy wins state level boxing tournament : बुलडाणा येथे पार पडलेल्या ९० राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिक्य स्पर्धेत क्रीडा प्रबोधनी अकोला हा संघ विजयी ठरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा बॉक्सिंग असोशिएशनच्यावतीने ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत बुलडाणा येथे पार पडलेल्या ९० राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिक्य स्पर्धेत क्रीडा प्रबोधनी अकोला हा संघ विजयी ठरली आहे. मुंबई उपनगर बॉक्सिंग संघ हा उपविजेता ठरला आहे. पुणे बॉक्सिंग असोसिएशन या संघाला तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. अंतिम लढतीच्या विविध वजन गटातील महाराष्ट्रातील १३ मुष्टियोध्दे बेल्लारी (कर्नाटक) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये मुंबई विभागाचे ५, पुणे जिल्ह्याचे ४, कोल्हापूर ३, जालना १ या मुष्टियोध्दांचा समावेश आहे. विविध वजन गटात या स्पर्धेची ७ सप्टेंबर रोजी अंतिम लढत झाली. सुपर हेवीवेट (९२ किलो) गटात पुण्याच्या रेनॉल्ड जोसेफ याने मुंबई उपनगराच्या अनिल सिंग यांचा पराभव करुन “उत्कृष्ट बॉक्सर किताब” पटकाविला. या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य, व कांस्य पदक देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोशिएशनचे महासचिव डॉ.राकेश तिवारी यांनी संपूर्ण स्पर्धेच्या कालावधीत स्पर्धा यशस्वी करण्याचे योग्य नियोजन केले. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष भरतकुमार वावळ यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा बॉक्सिंग असो.चे अध्यक्ष विठ्ठल लोखंडकर, उपाध्यक्ष नीलेश इंगळे, कोषाध्यक्ष प्रा.डॉ.संतोष आंबेकर, सचिव राज सोळंकी, मदनराजे गायकवाड, मोहम्मद सुफीयान व त्यांच्या चमूने सहकार्य करून स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाboxingबॉक्सिंग