पालकानो, मुला-मुलींकडे द्या लक्ष! निर्जनस्थळी गुलगुल करणे भोवले, ‘दामिनी’ने पोलीस स्टेशन दावले

By भगवान वानखेडे | Updated: March 23, 2023 20:20 IST2023-03-23T20:20:10+5:302023-03-23T20:20:44+5:30

अशा प्रकारे निर्जनस्थळी गुलगुल करणाऱ्यांना दामिनी पथकाकडून पोलीस स्टेशन दाखविले जात आहे.

Action of Damini squad in buldana Parents, pay attention to boys and girls | पालकानो, मुला-मुलींकडे द्या लक्ष! निर्जनस्थळी गुलगुल करणे भोवले, ‘दामिनी’ने पोलीस स्टेशन दावले

संग्रहित छायाचित्र

बुलढाणा : शहर परिसरातील निर्जनस्थळी बसुन कॉलेजियन तरुण-तरुणी गुलगुल करीत असतात. अशांवर दामिनी पथकाकडून कारवाई केली जात असून, गुरुवारी दुपारी ३ वाजता दरम्यान पथकाने एका तरुण-तरुणीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर केले. अशा प्रकारे निर्जनस्थळी गुलगुल करणाऱ्यांना दामिनी पथकाकडून पोलीस स्टेशन दाखविले जात आहे.

प्रेम हे आंधळं असते. मात्र, याच आंधळ्या प्रेमापोटी काही तरुण-तरुणी शाळा-महाविद्यालयाला दांडी मारुन निर्जनस्थळी एकांतात बसून गुलगुल करतात. मात्र, यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणुन मागील वर्षी नवरात्रोत्सवात दामिनी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडून शहर आणि परिसरात पेट्रोलिंग केली जात आहे. दरम्यान गुरुवारी मलकापूर रोडवरील व्ह्यू पॉंईंटवर दामिनी पथकाने पेट्रोलिंग करताना एक तरुण-तरुणीस ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

अश करण्यात आल्या आतापर्यंत कारवाया
महिना       कारवाया
जानेवारी        २५
फेब्रुवारी        २७
मार्च              २० आजपर्यंत

Web Title: Action of Damini squad in buldana Parents, pay attention to boys and girls