शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 01:01 IST

देऊळगाव राजा : शहरामध्ये उत्पादन शुल्क विभागाने शहरामध्ये तीन ठिकाणी छापा टाकून तीन जणांविरुद्ध कारवाई केली.

मोठ्या विक्रेत्यांना अभय, किरकोळ विक्रेत्यांना केले लक्ष्य देऊळगाव राजा : शहरामध्ये उत्पादन शुल्क विभागाने शहरामध्ये तीन ठिकाणी छापा टाकून तीन जणांविरुद्ध कारवाई केली. अधिकाऱ्यांनी केवळ किरकोळ दारू विक्रेत्यांना लक्ष्य केले असून, मोठ्या विक्रेत्यांना मात्र अभय दिले आहे. ‘देऊळगाव राजात अवैध दारू विक्री’ या मथळ्याखाली १० एप्रिल रोजी लोकमतने बातमी प्रकाशित केली होती. सदर बातमीची दखल घेत कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाने अधीक्षक एस.एल. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक तुषार लव्हाळे आणि प्रदीप देशमुख यांनी देऊळगाव राजा शहरामध्ये दारू विक्रेत्यांवर तीन ठिकाणी छापे टाकून गणेश सखाराम मोरे, सतीश तुकाराम खुपसे तथा सर्जेराव हरिभाऊ खरात यांच्याकडून अवैध दारूसाठा किंमत ३९८० रुपयांचा माल जप्त केला. तसेच त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ड) प्रमाणे कारवाई केली. शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्रीचा गोरखधंदा करणारा एकही मोठा दारू माफिया त्यांना सापडला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत दुय्यम निरीक्षक तुषार लव्हाळे यांनी केवळ दोनच कर्मचारी असल्याने कारवाई करण्याबाबत अडचणी येत असल्याचे सांगितले.