शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या शोधार्थ सोनाळा पोलीस स्टेशनचे पथक रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 00:07 IST

संग्रामपूर: निमखेडी या आदिवासीबहुल खेड्यात मध्यप्रदेश पोलीस आणि देशी कट्टा बनविणाऱ्या सूत्रधारामध्ये चकमक घडल्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली होती.

पोलीस-आरोपी चकमक प्रकरण संग्रामपूर: तालुक्यातील निमखेडी या दुर्गम आदिवासीबहुल खेड्यात मध्यप्रदेश पोलीस आणि देशी कट्टा बनविणाऱ्या सूत्रधारामध्ये चकमक घडल्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली होती. दरम्यान, या चकमकीत आरोपी त्रिलोकसिंग सुलतानसिंग हा देशी कट्टा बनवणारा मुख्य सूत्रधार फरार होण्यात यशस्वी झाला होता. या फरार झालेल्या आरोपीच्या शोधार्थ सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिनसिंह परदेशी यांच्यासह ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक आदिवासी दुर्गम भागातील अंबाबरवा, चिचारी, निमखेडी या आदिवासी भागातील गावात आरोपीच्या शोधार्थ रवाना झाले आहेत.गत काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील खंडवा पोलिसांनी बुऱ्हाणपूर-इंदूर बसमध्ये प्रवास करणाऱ्या युवकाकडून ८ देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केल्याची कारवाई केली होती. दरम्यान, या युवकाला खंडवा पोलिसांनी अटक केल्यानंतर या युवकाने संबंधित पिस्तूल बनवण्याचे काम संग्रामपूर तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या पाचोरी गावात होत असून, यामध्ये देशी पिस्तूल बनवणारा मुख्य सूत्रधार त्रिलोकसिंग सुलतानसिंग असल्याची माहिती खंडवा पोलिसांना अटक करण्यात आलेल्या युवकाने दिली. युवकाने दिलेल्या या माहितीवरून खंडवा पोलिसांची चमू चारचाकी वाहनाने २४ एप्रिल रोजी पाचोरी येथे दाखल झाली व पाचोरी येथून या प्रकरणातील आणखी ३ आरोपींना खंडवा पोलिसांनी पाचोरी येथून अटक केली. दरम्यान, खंडवा पोलीस या चार आरोपींना सोबत घेऊन पाचोरी येथून खंडवा येथे जात असताना त्यांना या प्रकरणातील देशी कट्टा बनविणारा मुख्य सूत्रधार त्रिलोकसिंग सुलतानसिंग हा संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी येथे असल्याची माहिती खंडवा पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीवरून खंडवा पोलिसांनी त्याच्याकडील गाडी संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी गावाकडे वळवली व निमखेडी येथे जात असताना निमखेडी गावात एका जमावामध्ये देशी कट्टा बनविणारा मुख्य सूत्रधार त्रिलोकसिंग सुलतानसिंग दिसून आला; मात्र आपल्याला पोलीस अटक करण्यास आल्याची भनक लागताच त्रिलोकसिंगने पळ काढला.