शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

रेमडेसिविरचा काळाबाजार प्रकरणातील आरोपींना १० मे पर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 10:52 AM

Remdesivir black market case राम गडाख, लक्ष्मण तरमळे, संजय इंगळे अशी या आरोपींची नावे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : रेमडेसिविरच्या काळ्याबाजार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना बुलडाणा न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी रेमडेसिविरच्या काळ्याबाजार प्रकरणी बुलडाणा शहरातील दोन नामांकित रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्याकडून रेमडेसिविर इंजेक्शनसह रोख सात हजार रुपये, दोन दुचाकी व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. राम गडाख, लक्ष्मण तरमळे, संजय इंगळे अशी या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास बुलडाणा शहर पोलिसांकडे देण्यात आला आहे. आरोपींना बुलडाणा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची १० मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.दरम्यान, आता एक ओरिजनल आणि आठ बनावट रेमडेसिविर इंजेक्शन या आरोपींनी कुठून मिळविले, या दिशेने पोलिसांचा तपास राहील. सोबतच संबंधित दोन्ही नामांकित रुग्णालयातील कर्मचारी व प्रसंगी डॉक्टरांचीही चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भाने ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता, चौकशीत ज्या पद्धतीने माहिती समोर येईल, त्या पद्धतीने आमचा तपास राहील. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत कोण कोण संशयाच्या भोवऱ्यात येतो व त्यांच्या चौकशीतून काय बाहेर येते, याकडे सध्या लक्ष लागून आहे.

रिकामे रेमडेसिविर आरोपींकडे कसे?रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर झाल्यानंतर त्यावर मार्किंग तथा ज्या रुग्णाला देण्यात आले आहे त्याचे नाव त्या खोक्यावर लिहून रिकाम्या इंजेक्शनची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना अन्न व अैाषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत पूर्वीच दिल्या आहेत. मात्र त्याउपरही या आरोपींकडे रिकाम्या इंजेक्शनचे खोके, कुपी कशा आल्या हाही पोलिसांच्या तपासाचा प्रसंगी भाग राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरbuldhanaबुलडाणा