युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 17:19 IST2019-05-17T17:18:30+5:302019-05-17T17:19:25+5:30
युवतीची हत्या केल्यानंतर या आरोपीने रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.

युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथील संजिवनी कॉलनी परिसरातील एका शाळेनजीक युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा शोध लागला असून, युवतीची हत्या केल्यानंतर या आरोपीने रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
युवतीच्या खून प्रकरणाशी धागेदोरे जुळत असलेल्या आरोपीचे नाव सागर निंबोळे रा. पातूर असे आहे. संजिवनी कॉलनीत शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कु. अश्विनी सुधीर निंबोकार(२७) या युवतीची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने शेगावच्या दिशेने पळ काढला. पोलिस मागावर असल्याचे समजताच, सागर निंबोळे याने रेल्वेतून उडी मारून घेत, आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत त्याला अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.