खामगावात तरुणीची भरदिवसा हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 03:25 PM2019-05-17T15:25:14+5:302019-05-17T15:26:58+5:30

खामगाव :  स्थानिक संजिवनी कॉलनीत एका २७ वर्षीय युवतीचा खून झाला.

Woman's murder in Khamgaon | खामगावात तरुणीची भरदिवसा हत्या

खामगावात तरुणीची भरदिवसा हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देकु. अश्विनी सुधीर निंबोकार(२७) असे खून झालेल्या युवतीचे नाव असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता दरम्यान उघडकीस आली. हल्लयानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले.

संजिवनी कॉलनीत युवतीचा भरदिवसा खून

खामगाव :  स्थानिक संजिवनी कॉलनीत एका २७ वर्षीय युवतीचा खून झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता दरम्यान उघडकीस आली. भरदिवसा उघडकीस आलेल्या या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे.

कु. अश्विनी सुधीर निंबोकार(२७) असे खून झालेल्या युवतीचे नाव असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतक युवती स्थानिक सनी पॅलेस भागात राहणारी असल्याचे समजते. धारधार शस्त्राचे युवतीच्या चेहºयावर आणि पोटावर सपासप वार केल्यानंतर हल्ला करण्यात आल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लयानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले असून, पोलिस याप्रकरणी कसून शोध घेताहेत. 

Web Title: Woman's murder in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.