शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

इज्तेमावरून परतणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:40 PM

खामगाव नजीक असलेल्या मोठ्या हनुमान मंदिराजवळ या भाविकांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: अमरावती येथे पार पडलेल्या मुस्लीम बांधवांच्या इज्तेमावरुन परतत असतांना भाविकांच्या प्रवासी वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात १ जण ठार झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी पहाटे अकोला महामार्गावरील मोठ्या हनुमान मंदिरानजीक घडली.मुस्लीम समाजाचा सर्वात मोठा राज्यस्तरीय आलमी इन्तेमा अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अमरावती विभागासह नागपूर येथील मुस्लिम समाज बांधव मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मुस्लिम समाज बांधवही सहभागी झाले होते. दरम्यान, अमरावती येथील इज्तेमाचा सोमवारी सामूहीक दुवा (प्रार्थना) नंतर समारोप झाला. त्यानंतर चिखली येथील भाविक एमएच २८ एबी-२८४३ या प्रवासी वाहनाने अकोला मार्गे चिखलीकडे परतत होते. दरम्यान, खामगाव नजीक असलेल्या मोठ्या हनुमान मंदिराजवळ या भाविकांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात प्रवासी वाहनाचा चालक मो.शारीक शे. उमर (४२) रा. गौरक्षण रोड वाडी ता. चिखली याचा जागीच मृत्यू झाला. तर सदाम शाह, मेहबुब शाह (२८) शे. रेहान शे. सादीक (१६), शे. आसीफ शे. हसन, रफिक मनीयार, शे. रहीम शे, बादशाह (३६), फरदिन शे. रफीक (१५), शे. फैजान शे. शारीक (१८), इजहान अहमद (११) यांना उपचारार्थ खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने शेख साहिल आणि शेख फैजान यांना खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर शेख रफिक शेख मन्नु आणि शेख आसिफ शेख हसन यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. याप्रकरणी शे.शकील शे. मिया रा. साखरखेर्डा यांच्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ४२७ भादंवि सह कलम १३४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात