दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 07:45 PM2018-04-20T19:45:34+5:302018-04-20T19:45:34+5:30

जप्त केलेला लाकडाचा ट्रक सोडण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारणाºया वनपालास चिखली तालुक्यातील एकलारा फाट्याजवळ रंगेहात पकडल्याची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजेदरम्यान केली.

Accepting a ten thousand bribe one arrest | दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात

दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात

Next

बुलडाणा - जप्त केलेला लाकडाचा ट्रक सोडण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारणाºया वनपालास चिखली तालुक्यातील एकलारा फाट्याजवळ रंगेहात पकडल्याची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजेदरम्यान केली. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील ३७ वर्षिय तक्रारकर्ते यांनी बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, जप्त केलेला लाकडाचा ट्रक
सोडण्यासाठी आरोपी वनपाल पुरूषोत्तम बुटे यांने २० हजाराची लाच मागितली होती. मात्र तडजोडीनंतर १० हजार देण्याचे ठरल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीच्या आधारे बुलडाणा लाच लुचपत विभागाचे अमरावती येथील पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, बुलडाणा येथील पोलिस उपअधिक्षक, शैलेश प्र. जाधव  यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रवीण खंडारे, पथकातील कर्मचारी राजू जंवजाळ, प्रदिप गडाख, दिपक लेकुरवाळे, विनोद लोखंडे, जगदीश पवार, निलेश सोळंकी चालक समीर शेख यांनी चिखली तालुक्यातील एकलारा फाट्याजवळ सापळा रचला. यावेळी बुलडाणा येथील जुना गावातील रहिवासी वनपाल
पुरूषोत्तम  माधवराव बुटे (वय ५७) याने  लाचेची मागणी करून दहा हजार रुपये रोख रक्कम स्वीकारत असताना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले. यावेळी आरोपीकडून १० हजार रूपये जप्त करण्यात आले. तसेच कलम ७, १३, (१)(ड) सह १३ (२) लाच लुचपत प्रतिबंधक कायदा सन २०८८ गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

Web Title: Accepting a ten thousand bribe one arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.