बुलढाण्यात मारहाणप्रकरणी उपाेषणानंतर अखेर गुन्हे दाखल
By संदीप वानखेडे | Updated: August 16, 2023 16:56 IST2023-08-16T16:55:37+5:302023-08-16T16:56:24+5:30
मारहाण करणाऱ्यांविरुद्ध फिर्याद देऊनही गुन्हे दाखल न झाल्याने सागर कुशकुमार वेरूळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण सुरू केले हाेते.

बुलढाण्यात मारहाणप्रकरणी उपाेषणानंतर अखेर गुन्हे दाखल
बुलढाणा : मारहाण करणाऱ्यांविरुद्ध फिर्याद देऊनही गुन्हे दाखल न झाल्याने सागर कुशकुमार वेरूळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण सुरू केले हाेते. या उपोषणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन आराेपींविरुद्ध १५ ऑगस्ट राेजी बुलढाणा शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण पुढील तपासासाठी नांदुरा पाेलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
सागर वेरूळकर (रा. नागलकरनगर, नांदुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीत मनोरमा कुशकुमार वेरूळकर, शुभम कुशकुमार वेरूळकर, सुनील सुरडकर (सर्व रा. पाण्याच्या टाकीजवळ, नांदुरा), राजेंद्र अंबादास पारखेडे (गुरव) (निमगाव, ता. नांदुरा, जि. बुलढाणा), गजानन जनार्दन इंगळे (तथागतनगर, नांदुरा), प्रफुल्ल रघुनाथ दाने (सुदर्शननगर, नांदुरा) यांनी आपल्याला शेतीच्या वादातून मारहाण केल्याचे म्हटले आहे. तसेच याप्रकरणी आराेपींवर गुन्हे दाखल न झाल्याने त्यांनी उपाेषण सुरू केले हाेते. या उपोषणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या आराेपीविरुद्ध बुलढाणा शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपासासाठी नांदुरा पाेलिसांकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.