रेल्वेच्या धडकेत ९ जनावरे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:29 IST2018-12-15T17:29:41+5:302018-12-15T17:29:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जलंब : रेल्वेच्या धडकेत ९ जनावरे ठार झाल्याची घटना १५ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता ...

रेल्वेच्या धडकेत ९ जनावरे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
जलंब : रेल्वेच्या धडकेत ९ जनावरे ठार झाल्याची घटना १५ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता जलंब परिसरात घडली. या घटनेमुळे पशुपालक व शेतकºयांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जलंब ते शेगाव रेल्वे लाईनवर जलंब रेल्वे गेट ते पाई मंदिर दरम्यान पहाटे ५ वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वरी एक्सप्रेस व मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीच्या धडकेत गायी, वासरं, बैल अशी लहान मोठी ९ जनावरे ठार झाली आहेत. आहेत. बहूदा ही जनावरे रेल्वे लाईनवर उभी किंवा रेल्वे लाईन ओलांडत असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती कळताच शेगाव येथील रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान मृत्युमुखी पडलेली ही ९ जनावरे कोणाची आहेत, याबाबत माहिती कळू शकली नाही. (वार्ताहर)