मेहकर : तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अवैध वाहतूक सुरु होती. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरुन ही वाहतूक सुरु होती. यासंदर्भात ह्यलोकमतह्ण मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्या वृत्ताची दखल घेत अवैध वाहतूक करणार्या एकूण ९२ वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करुन १८ हजार ३00 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.मेहकर येथून चिखली, मालेगाव, रिसोड, लोणार, जानेफळसह ग्रामीण भागात काळीपिवळी, मिनीडोअर, ऑटो अशा वाहनाद्वारे अवैध वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरु होती. लोकांना शेळ्या-मेंढय़ा सारखे वाहनांमध्ये कोंबून वाहतूक सुरु होती. तर अनेकवेळा अशा वाहनांचे लहानमोठे अपघातही झाले आहेत. तर पोलिसांकडूनही या अवैध वाहतुकीला अभय दिले जात होते. दरम्यान लोकमतमध्ये वृत्त झळकताच १६ सप्टेंबर रोजी अवैध वाहतूक करणार्या १0 काळीपिवळी तर ८२ इतर अशा एकूण ९२ वाहनांवर ठाणेदार मधुकर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक विलास मुंढे, वाहतूक पोलिस विजय किटे, गजानन भराड, बद्रीनाथ मुंढे, अनिल वाघ यांनी कारवाई करुन १८ हजार ३00 रुपये दंड वसुल केला आहे.
९२ वाहनांवर कारवाई
By admin | Updated: September 18, 2014 00:51 IST