शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांची ७४ पदे रिक्त

By admin | Updated: April 8, 2015 01:53 IST

खामगाव उपविभाग ; प्रभारी चालतो पोलीस पाटलाचा कारभार.

खामगाव (जि. बुलडाणा): उपविभागात पोलीस पाटलांची १८८ पदे मंजूर असताना सद्य:स्थितीत ११४ गावातच पोलीस पाटील कायमस्वरूपी कार्यरत आहे. खामगाव तालुक्यातील ५३ तर शेगाव तालुक्यातील २१ ठिकाणी पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. या रिक्त गावातील कामकाज प्रभारी चालत आहे. प्रशासन व गावातील नागरिकांचा दुवा म्हणून प्रत्येक गावात पोलीस पाटलाची नियुक्ती शासनाकडून करण्यात येते. गावातील नागरिकांना शैक्षणिक तसेच विविध शासकीय कामकाज, दाखल्यासाठी पोलीस पाटलाची गरज आहे. वर्षभरात सण, उत्सव व मिरवणुकीमध्ये पोलीस पाटलाची महत्त्वची जबाबदारी आहे. अलीकडच्या काळात राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत पोलीस पाटलांची भूमिका वाखाणण्यासारखी राहिली आहे. पोलीस प्रशासनाला गाव तंटामुक्त करण्यासाठी पोलीस पाटलांचे सहकार्य मिळाले आहे. आज जिल्हय़ातील प्रत्येक गाव तंटामुक्त घोषित झाले आहे. पोलीस पाटलाच्या पदाबाबत तंटामुक्त अभियानामुळे प्रकाशझोतात आली आहेत. खामगाव उपविभागात पोलीस पाटलाची १८८ पदे आहेत. यामध्ये खामगाव तालुक्यातील कोलोरी, शेलोडी, आवार, गारडगाव बु., कुर्‍हा, माथणी, नागापूर, माक्ता, जळका तेली, देऊळखेड, अडगाव, लोणी गुरव, सुटाळा बु., सजनपुरी, वाडी, जयपूर लांडे, घाणेगाव, राहुड, कुंबेफळ, भंडारी, जळका भडंग, हिवरा बु., निमकवळा, तांदुळवाडी, बोरजवळा, चिंचपूर, किन्ही महादेव, कंचनपूर, गवंढाळा, पिंप्री कोरडे, नायदेवी, दधम, कोन्टी, गेरु, दुधा, निरोड, निमखेड, बोथा फॉरेस्ट, पिंप्री धनगर, नांद्री, मांडणी, जयरामगड, सुजातपूर, अकोली, हिंगणा उमरा, उमरा लासुरा, दोंदवाडा, खोलखेड, रोहणा, कंझारा व बोथाकाजी या ५३ गावात पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. शेगाव तालुक्यातील चिंचोली, गव्हाण, जवळा बु., भोनगाव, येऊलखेड, गौलखेड, लासुरा खुर्द, गोळेगाव खुर्द, गावगाव खुर्द, घुई, कनारखेड, टाकळी नागझरी, खेर्डा, मच्छींद्रखेड, सगोडा, वरध, टाकळी हाट, चिंचखेड नवी वस्ती, कठोरा, सांगवा, तरोडा कसबा या गावातील पदे मयत अथवा सेवानवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. गेल्या काही दिवसात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्याने पोलीस पाटलाची रिक्त पदे भरणे गरजेचे झाले आहे.