शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

५०० क्विंटल कापूस आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 3:56 PM

Fire News शनिवारी दुपारी दोन वाजता अचानकपणे आगीने पुन्हा रौद्ररूप धारण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : श्री कोटेक्स जिनिंग मधील कापसाला शुक्रवारी रात्री व शनिवारी दुपारी आग लागली. यामध्ये सुमारे ३० लाख रूपये किंमतीचा ५०० क्विंटल कापूस भस्मसात झाला. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेगाव, खामगाव व नांदुरा यासह स्थानिक अग्निशामक दलाने प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. जळगाव जामोद-सुनगाव रोडवर श्री कॉटेक्स जिनिंग व प्रेसिंग आहे. या जिनिंग मध्ये यावर्षी कापूस खरेदी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, शनिवारी सकाळी या जिनिंगमध्ये पणन महासंघाच्या वतीने सुद्धा कापूस खरेदी करण्यात येणार होती. परंतु, शुक्रवारी रात्री ११.३० ते १२ वाजताच्या सुमारास कापसाच्या गंजीला आग लागल्याचे लक्षात आले. त्यामुळे शेगाव, खामगाव नांदुरा यासह जळगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग पूर्ण नियंत्रणात आल्याची खात्री झाल्यानंतर चारही अग्निशामक दल सकाळी परत पाठविण्यात आले. आमदार डॉ. संजय कुटे यांनी रात्री हजर राहत आग विझवण्यासाठी सूचना दिल्या. शनिवारी दुपारी दोन वाजता अचानकपणे आगीने पुन्हा रौद्ररूप धारण केले. पुन्हा वेगळ्या केलेल्या अन्य कापसाच्या गंजीला आग लागली. त्यामुळे पुन्हा चारही अग्निशामक बंबाला पुन्हा पाचारण करण्यात आले.
टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदbuldhanaबुलडाणाfireआग