५०० क्विंटल कापूस आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 15:56 IST2020-11-29T15:56:29+5:302020-11-29T15:56:35+5:30

Fire News शनिवारी दुपारी दोन वाजता अचानकपणे आगीने पुन्हा रौद्ररूप धारण केले.

500 quintals of cotton burnt in the fire | ५०० क्विंटल कापूस आगीत भस्मसात

५०० क्विंटल कापूस आगीत भस्मसात

कमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : श्री कोटेक्स जिनिंग मधील कापसाला शुक्रवारी रात्री व शनिवारी दुपारी आग लागली. यामध्ये सुमारे ३० लाख रूपये किंमतीचा ५०० क्विंटल कापूस भस्मसात झाला. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेगाव, खामगाव व नांदुरा यासह स्थानिक अग्निशामक दलाने प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. जळगाव जामोद-सुनगाव रोडवर श्री कॉटेक्स जिनिंग व प्रेसिंग आहे. या जिनिंग मध्ये यावर्षी कापूस खरेदी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, शनिवारी सकाळी या जिनिंगमध्ये पणन महासंघाच्या वतीने सुद्धा कापूस खरेदी करण्यात येणार होती. परंतु, शुक्रवारी रात्री ११.३० ते १२ वाजताच्या सुमारास कापसाच्या गंजीला आग लागल्याचे लक्षात आले. त्यामुळे शेगाव, खामगाव नांदुरा यासह जळगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग पूर्ण नियंत्रणात आल्याची खात्री झाल्यानंतर चारही अग्निशामक दल सकाळी परत पाठविण्यात आले. आमदार डॉ. संजय कुटे यांनी रात्री हजर राहत आग विझवण्यासाठी सूचना दिल्या. शनिवारी दुपारी दोन वाजता अचानकपणे आगीने पुन्हा रौद्ररूप धारण केले. पुन्हा वेगळ्या केलेल्या अन्य कापसाच्या गंजीला आग लागली. त्यामुळे पुन्हा चारही अग्निशामक बंबाला पुन्हा पाचारण करण्यात आले.

Web Title: 500 quintals of cotton burnt in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.