शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा बीजोत्पादनात ५० टक्के घट

By admin | Updated: April 13, 2017 00:56 IST

सिंदखेड राजा- वातावरणातील कोरडेपणा, आलेले धुके व कमी होत असलेल्या मोहळाच्या मधमाशा, यामुळे कांदा बीजोत्पादनात ५० टक्के घट झाली आहे.

वातावरणाचा फटका : शेतकरी हवालदिल

काशिनाथ मेहेत्रे - सिंदखेड राजा वातावरणातील कोरडेपणा, आलेले धुके व कमी होत असलेल्या मोहळाच्या मधमाशा, यामुळे कांदा बीजोत्पादनात ५० टक्के घट झाली आहे. सतत दोन वर्षे दुष्काळ, गारपीट यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस पडला. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन ही पीके चांगली आली. तुरीच्या पिकाने तर उत्पादनाचा उच्चांक मोडला. शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कांदा बीजोत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. कांद्याचे पीकही चांगले आले. मोठमोठी बोंड पडली; परंतु बीजोत्पादन झाले नसल्याचे नशिराबाद येथील शेतकरी नारायण मेहेत्रे, दिलीप कुंडलीक मेहेत्रे यांच्या शेतात निदर्शनास आले. उत्पादन खर्चसुद्धा वसूल होतो की नाही, या धास्तीने बळीराजा हवालदिल झाला आहे. यावर्षी मूग, उडीद, सोयाबीन, कापूस तूर ही पिके चांगली आली; परंतु शासनाच्या शेतमाल आयातीच्या धोरणामुळे उत्पादन होऊनही बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे. खरिपामध्ये झालेले नुकसान रब्बीच्या पिकात भरून निघेल, या आशेने शेतकऱ्यांनी शाळू, गहू याची पेरणी केली व नगदी पीक म्हणून कांद्याची लागवड बीजोत्पादनासाठी केली. पाऊस सुरुवातीला चांगला पडला. त्यानंतर आजपर्यंत पाऊस आलाच नाही. थंडी जास्त पडल्यामुळे शाळू ज्वारी उत्पादनात घट आली. कांद्याचे पीक चांगले आले. मात्र, हवामानाचा दुष्परिणाम, धुके व मधमाशांचे प्रमाण कमी झाल्यामुळे कांद्याचे बियाणे भरले नाही.