शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मारोती संस्थानला केली ५0 लाखाची जागादान

By admin | Updated: January 20, 2015 23:15 IST

हिंदु मुस्लिम समाजापुढे भाई मन्सूर अजिज दाऊद यांचा आदर्श.

मोताळा (बुलडाणा): हिंदू-मुस्लीम समाजातील वादाचे प्रसंग सर्वांनाच माहित आहेत मात्र हिंदूच्या मंदिरासाठी मुस्लीम बांधवाने जागा उपलब्ध करून देण्याचा प्रसंग विरळच. नांदूरा-मोताळा मार्गालगत मन्सुर अजिज दाऊद यांचे सिमेंट हाऊसची जागा असुन तिची आजची किमंत ५0 लाख रुपये आहे मात्र गावातील मारोती संस्थानसाठी मन्सूर अजिज दाऊद यांनी ही जागा दान करून सामाजीक सद्भावनेचे अनोखे उदाहरण ठेवले आहे.मोताळा-नांदूरा मार्गाला लागून मारोती संस्थानच्या १ हेक्टर ९ आर पडीत जागेवर भव्य व्यापारी संकूलाचे काम संस्थानाच्या वतीने सुरु आहे. या जागेवरच रोडला लागून भाई मन्सूर अजिज दाऊद यांची सिमेंट हाऊस हे दुकान आहे. या दुकानाची व्यापारीसंकूल तयार करण्यासाठी अडचण होत होती ही अडचण ओळखून सदर जागा संस्थानला देण्याबाबत संस्थानच्यावतीने मन्सूर अजिज दाऊद यांना विनंती करण्यात आली. या विनंतीचा मन्सुर अजिज यांनी तत्काळ स्विकार करीत ही जागा श्री मारोती संस्थानला दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाबद्दल मारोती संस्थानच्यावतीने अध्यक्ष अण्णा देशमुख यांच्याहस्ते भाई मन्सूर यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.