बुलडाणा जिल्ह्यात आठवीपर्यंतचे ३.६५ लाख विद्यार्थी विना परीक्षा पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:14 PM2021-04-04T12:14:11+5:302021-04-04T12:14:41+5:30

Education sector News : जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार ६१७ विद्यार्थी विना परीक्षा पास झाले आहेत.

3.65 lakh students up to 8th standard pass without examination in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात आठवीपर्यंतचे ३.६५ लाख विद्यार्थी विना परीक्षा पास!

बुलडाणा जिल्ह्यात आठवीपर्यंतचे ३.६५ लाख विद्यार्थी विना परीक्षा पास!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गत एक वर्षापासून शाळा बंद असल्याने हे शैक्षणिक वर्ष वाया जाते की काय? अशी भीती मनामध्ये असतानाच शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार ६१७ विद्यार्थी विना परीक्षा पास झाले आहेत. कोरोना पावल्याने मुले खूश आहेत, परंतू मुलांचा पुरेसा अभ्यस न झाल्याने पालक चिंतेत आहेत.
कोरोनामुळे एक वर्षापासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, कोणतीही परीक्षा न देता उत्तीर्ण होणार आहेत. 

Web Title: 3.65 lakh students up to 8th standard pass without examination in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.