शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध उत्खनन माफीयांना १८ लाख रुपये दंड

By admin | Updated: February 24, 2015 00:19 IST

मेहकार तालुक्यात अवैध मुरुम उत्खननासंदर्भात धडक कारवाई.

मेहकर (जि. बुलडाणा) : स्थानिक तहसिल कार्यालयाच्यावतीने अवैध उत्खनन माफीयांना १८ लाख ९ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. सदर कारवाई तहसिलदार निर्भय जैन यांनी २१ फेब्रुवारी रोजी केली असून, यात २ जणांना दंडाचा आदेश पारित करण्यात आला आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, साखरखेर्डा येथील राजेंद्र काटे यांनी १६ फेब्रुवारी रोजी मौजे कल्याणा ते बाभुळखेड रस्त्याच्या कामासाठी विनापरवाना ८0 ब्रास मुरुमाची वाहतूक केली. मौजे उसरण येथील विमलबाई भिमराव शेळके यांच्या मालकीच्या गट नं.३0/१ मधील जागेतून ३२५ ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन केले, असा पंचनामा नागझरी बु. येथील तलाठी गारोळे व कल्याणा येथील तलाठी तांबेकर यांनी केला होता. त्यावर राजेंद्र काटे यांना २0 फेब्रुवारी रोजी याप्रकरणी तहसिल कार्यालयात हजर राहण्याकरीता नोटीस देण्यात आली होती. परंतु ते हजर न राहल्याने २१ फेब्रुवारी रोजी तहसिलदार निर्भय जैन यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नियमान्वये ४0५ ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याबद्दल राजेंद्र काटे यांना कलम ४८ (८) नुसार १२ लाख ९७ हजार रुपये दंडाचा आदेश पारीत केला आहे. त्यानंतर मौजे गोहोगाव ते डोणगाव रस्त्याच्या कामासाठी अ‍े.जी.मापारी यांनी विना परवाना १६0 ब्रास मुरुमाचे उत्खनन केल्याचा पंचनामा तलाठी गोहोगाव यांनी १५ एप्रिल २0१४ रोजी केला होता. त्यानंतर अ‍े.जी.मापारी यांना तहसिल कार्यालयात हजर राहण्यासंदर्भात अनेकवेळा नोटीस दिल्या. परंतु ते एकदाही हजर राहिले नाही. त्यामुळे तहसिलदार निर्भय जैन यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नियमान्वये १६0 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याबद्दल अ‍े.जी.मापारी यांना ५ लाख १२ हजार रुपये दंडाचा आदेश पारीत करण्यात आला आहे. तहसिलदार निर्भय जैन यांनी अवैध मुरुम उत्खननाबद्दल केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध उत्खनन माफीयांचे धाबे दणाणले आहेत.