१७ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; मेहकर येथे घडली धक्कादायक घटना

By संदीप वानखेडे | Updated: December 29, 2023 19:04 IST2023-12-29T19:02:24+5:302023-12-29T19:04:17+5:30

पाेलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नाेंद

17-year-old boy commits suicide by hanging; Incident at Mehkar | १७ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; मेहकर येथे घडली धक्कादायक घटना

१७ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; मेहकर येथे घडली धक्कादायक घटना

संदीप वानखडे / बुलढाणा - मेहकर: शहरातील १७ वर्षीय मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २९ डिसेंबर राेजी घडली. निखिल रमेश मानवतकर असे मृत मुलाचे नाव आहे.

जानेफळ रस्त्यावरील गारोळे यांच्या आरामशीन मागील अण्णा भाऊ साठे नगरातील रहिवासी रमेश मानवतकर हे मजुरीसाठी बाहेरगावी गेले हाेते़ तर त्यांची पत्नी घरी नसताना त्यांचा १७ वर्षीय मुलगा निखिल याने दोरीचा गळफास घेऊन घरात आत्महत्या केली. त्याचा लहान भाऊ घरी आला असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून पुढील तपास मेहकर पोलिस करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत निखिलच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. त्याच्या पश्चात बराच माेठा आप्त परिवार आहे़.

Web Title: 17-year-old boy commits suicide by hanging; Incident at Mehkar