शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

१६६ शेतकर्‍यांनीच भरले कर्जमाफीचे अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:16 IST

मेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा  केली; मात्र कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा  करायची, तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकर्‍यांना  अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा  आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यात  जवळपास ३५ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ १६६ शे तकर्‍यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून, सरकारच्या जाचक  अटींमुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता  आहे. 

ठळक मुद्देसरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचा शिवसेनेचा  आरोपजिल्ह्यातील शेतकर्‍यांची दयनीय अवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा  केली; मात्र कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा  करायची, तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकर्‍यांना  अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा  आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यात  जवळपास ३५ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ १६६ शे तकर्‍यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून, सरकारच्या जाचक  अटींमुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता  आहे. तालुक्यात अलीकडच्या काळात पावसाच्या लहरीपणामुळे  िपकांच्या उत्पादनात घट होत आहे. दरवर्षी शेतकरी आर्थिक  अडचणीत येत आहेत. विविध बँकांचा कर्जाचा बोजा शे तकर्‍यांवर वाढतच आहे. सरकारकडूनही आर्थिक मदत मिळत  नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. भाजप सरकारने शे तकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही   सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांकडून कर्जमाफीसाठी  अर्ज भरुन घेण्यात येत आहेत; मात्र सरकारने कर्जाचा अर्ज भरून  घेत असताना त्या अर्जामध्ये तब्बल ५६ अटी टाकल्या असून,  बहुतांश अटी या जाचक आहेत. कर्जमाफीचे अर्ज हे ऑनलाइन  भरायचे आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मेहकर तालुक्यात  १६१ ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रापैकी केवळ ७ केंद्र सुरू आहेत. तर या केंद्रावर थम्ब  मशीन नाहीत, इंटरनेट सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे शे तकर्‍यांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. खा.प्रतापराव  जाधव व आ.संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली २२  ऑगस्ट रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, शिवसेना  तालुका प्रमुख सुरेश वाळूकर यांच्या नेतृत्वात विभागप्रमुख राजू  चव्हाण, प्रमोद काळे, अशोक बोरकर, गणेश शेवाळे, संदीप  गायकवाड, उत्तम परमाळे, रोहिदास जाधव, अशोक पसरटे, सु पाजी जाधव, तसेच प्रत्येक शाखा प्रमुखाने मेहकर तालुक्यातील  प्रत्येक ई-सेवा केंद्रावर जाऊन किती शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे  अर्ज भरले, यासंदर्भात माहिती घेतली असता, जवळपास ३५  हजार शेतकर्‍यांपैकी केवळ १६६ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे अर्ज  भरल्याचे आढळून आले. त्यामुळे सरकारच्या जाचक अटी,  सुविधा नसणे, शेतकर्‍यांमध्ये सरकारबद्दल रोष या सर्व गोष्टी पाह ता सरकारची कर्जमाफीची घोषणा ही शेतकर्‍यांची दिशाभुल  करणारी व फसवी असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात  आला आहे. 

सरकारकडून शेतकर्‍यांची थट्टा - राजेंद्र गाडेकरभाजप सरकार हे शेतकर्‍यांची थट्टा उडवित आहे. शेतकर्‍यांच्या  िपकांना भाव नाही, नोटा बंदी, महागाई यामुळे शेतकरी अगोदरच  आर्थिक अडचणीत सापडला असताना आता शेतकर्‍यांना दिलेली  कर्ज माफी ही नियमांच्या कचाट्यात अडकली आहे. त्यामुळे  सरकारने कर्जमाफीची केलेली घोषणा केवळ दिशाभूल करणारी  असून, एकप्रकारे शेतकर्‍यांची थट्टा सरकार उडवित असल्याचा  आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर यांनी केला आहे. 

जिल्ह्यातील शेतकर्‍यांची दयनीय अवस्थाबुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री हे जिल्ह्यातीलच  आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकर्‍यांची दयनीय  अवस्था आहे. तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल.  सरकारजवळ कोणतेही नियोजन नसल्याने केवळ कागदी घोडे,  घोषणाचा पाऊस व शेतकर्‍यांची दिशाभुल करण्यात येत आहे.  त्यामुळे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे राजेंद्र  गाडेकर व सुरेश वाळुकर यांनी सांगितले.

चिखली : शिवसेनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदनशेतकर्‍यांना कर्जमुक्तीचे अर्ज भरण्यासाठी येणार्‍या अडचणी दूर  कराव्या, या मागणीचे निवेदन २२ ऑगस्ट रोजी तहसीलदार झाल्टे  यांना तालुकाप्रमुख कपील खेडेकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात शेतकरी  कर्जमाफी योजनेचे अर्ज शेतकर्‍यांना ऑनलाइन भरणे आवश्यक  आहे. हे अर्ज महा-ई-सेवा केंद्रावर मोफत भरण्याची सुविधा  शासनाने दिली आहे; मात्र तालुक्यातील अनेक महा-ई-सेवा  केंद्रांवर यासाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध नसल्याने  शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत. याची दखल घेऊन महा-ई सेवा  केंद्रांना शासनाने शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीचे अर्ज भरण्यासाठी  लागणारे थंब मशीन उपलब्ध करून द्यावेत तसेच आनलाइन अर्ज  भरण्यासाठी लागणारा कालावधी पाहता अर्ज भरण्याची तारीखदे खील वाढवून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने  करण्यात आली असून, याबाबतचे निवेदन तहसीलदार झाल्टे  यांना तालुकाप्रमुख कपील खेडेकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले.  यावेळी शिवाजीराव देशमुख, नीलेश अंजनकर, दत्ता सुसर,  विलास घोलप, बाळू वराडे, संतोष वाकडे, रवि भगत, प्रीतम ैची,  गजानन पवार, विकी नकवाल, जितेंद्र पुरोहित, रामेश्‍वर कचाले,  िपंटू गायकवाड, बंडू नेमाने, शैलेंद्र डोणगावकर आदींसह  शिवसैनिकांची उपस्थिती होती.