शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील १२ इमारती धोकादायक!

By admin | Updated: June 8, 2017 02:30 IST

धोकादायक इमारतींचे संरचना परीक्षण नाही

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील ३0 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी झालेल्या धोकादायक इमारतींचे संरचना परीक्षण (स्ट्रक्चरल आॅडिट) करणे अनिवार्य आहे; मात्र स्थानिक पालिका प्रशासनाकडून या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना केल्या जात नसून, गेल्या पाच वर्षांपासून १२ धोकादायक इमारत मालकांना तसेच यामधील रहिवाशांना साधी नोटिसही बजावण्यात आली नसल्याची माहिती आहे.नगरपालिकेमार्फत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारतींना नोटिस बजावल्या जातात; परंतु या नोटिसांना कुणीही इमारत मालक अथवा भाडेकरू गांभीर्याने घेत नाहीत. दरम्यान, पालिकेच्या विविध विभागांमार्फतही केवळ कागदोपत्री कारवाईचा खेळ मांडला जातो. प्रत्यक्षात कुठेही कारवाई होताना दिसून येत नाही. वास्तविक ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त केल्यापासून ३0 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी झाला असेल अशा इमारती वास्तव्य करण्यायोग्य आहेत किंवा नाही, हे संरचना अभियंत्यामार्फत प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे. नगरपालिकेच्या नगररचना विभागाने यापूर्वी सन २0१३ मध्ये धोकादायक इमारतींना संरचना परीक्षण करून घेण्याबाबत सूचित केले होते; परंतु त्याची परिणामकारकपणे अंमलबजावणी झालेली नव्हती.शहरात २५ हजार मालमत्ता!शहरात सुमारे २५ हजार मालमत्ता असून, यापैकी बहुतांश मालमत्ता जुन्या आहेत. नियमानुसार बांधकाम करण्यात आले अथवा नाही? याचे सर्वेक्षण नगरपालिका प्रशासनाकडून करणे अपेक्षित आहे; मात्र शहरातील इमारतींचे संरचना परीक्षण अद्यापही करण्यात आलेले नाही. ज्या इमारतींबाबत तक्रारी प्राप्त होतात, त्याच इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. दरम्यान, घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळेच काही इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येते.धोकादायक इमारती अन् भाडेकरू!शहरातील १२ पेक्षा जास्त इमारती धोकादायक स्थितीत आहेत. काही धोकादायक इमारतींमध्ये वर्षानुवर्षांपासून भाडेकरू तग धरून असून, जीव मुठीत धरून राहत असलेल्या या भाडेकरुंचे वाद न्यायप्रविष्ट असल्याने पालिकेलाही कारवाई करणे अवघड होऊन बसते. मालक-भाडेकरू वादामुळे इमारतमालकही वाड्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याची वस्तुस्थिती आहे. अतिक्रमणाकडेही पालिकेचे दुर्लक्ष!शहरातील बहुतांश इमारत मालकांनी आपल्या घराशेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. सोबतच मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त बांधकाम केले आहे. अशा अतिक्रमण आणि बांधकाम धारकांवर कारवाई करणे पालिका प्रशासनाकडून अपेक्षित आहे; मात्र पालिका प्रशासनाकडून याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचे दिसून येते.