निरोगी आरोग्य हीच महिलांची खरी संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:46 IST2019-01-12T00:43:35+5:302019-01-12T00:46:46+5:30
ग्रामीण जनतेला विविध आजारावर मात करता यावे या हेतूने आरोग्य विभागाच्यावतीने नि:शुल्क रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ विशेष करून महिलांसह नागरिकांनी घेतला पाहिजे.

निरोगी आरोग्य हीच महिलांची खरी संपत्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रामीण जनतेला विविध आजारावर मात करता यावे या हेतूने आरोग्य विभागाच्यावतीने नि:शुल्क रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ विशेष करून महिलांसह नागरिकांनी घेतला पाहिजे. कारण निरोगी आरोग्य हिच सर्वांना आधार देणाऱ्या महिलांची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन जि.प. आरोग्य सभापती जयश्री गफाट यांनी केले.
आरोग्य विभाग जि.प. व तालुका वैद्यकीय अधिकारी पं.स.च्यावतीने शुक्रवार ११ जानेवारीला देवळीच्या ग्रामीण रुग्णालयात तालुकास्तरीय रोग निदान शिबीर घेण्यात आले. यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. व्यासपीठावर पं.स. सभापती विद्या भुजाडे, जि.प. सदस्य वैशाली येरावार, पं.स.गटविकास अधिकारी मनोहर बारापात्रे, सत्तार भाई शेख, डॉ. हेमंत घाटोळे, डॉ. संघर्ष राठोड, डॉ. प्राची गेडाम, डॉ. राहुल राठोड, डॉ. संजय दाढे, सिद्धार्थ तेलतुंबडे, दीपक कांबळे, सालम सईद, प्रमोद लकडे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी जि.प. सदस्य वैशाली येरावार, गटविकास अधिकारी मनोहर बारापात्रे यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण धमाने यांनी केले. संचालन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले तर आभार डॉ. संजय दाढे यांनी मानले. शिबिराचा ८५८ गरजुंनी लाभ घेतला हे विशेष.