Navratri : मी दुर्गा - समाजसेवी उद्योजिका मनस्वी घारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:03 IST2020-10-23T18:02:08+5:302020-10-23T18:03:04+5:30
Navratri , coronavirus, mi durga, devgad, sindhdurugnews समाज कार्यामध्ये महिलांची झेप घारीसारखी उंचावत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर देवगड तालुक्यामधील किंजवडे जिल्हा परिषद मतदार संघामधील गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तू व आशा स्वयंसेविकांना स्टीमर व त्यांना पाठबळ मिळण्यासाठी अनेक वस्तुंचा पुरवठा करुन ख-या अर्थाने कोरोनाच्या कालावधीमधील योध्दा ठरुन समाज कार्यामधील नवदुर्गा ठरल्या आहेत मनस्वी घारे.

Navratri : मी दुर्गा - समाजसेवी उद्योजिका मनस्वी घारे
अयोध्याप्रसाद गावकर
समाज कार्यामध्ये महिलांची झेप घारीसारखी उंचावत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर देवगड तालुक्यामधील किंजवडे जिल्हा परिषद मतदार संघामधील गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तू व आशा स्वयंसेविकांना स्टीमर व त्यांना पाठबळ मिळण्यासाठी अनेक वस्तुंचा पुरवठा करुन ख-या अर्थाने कोरोनाच्या कालावधीमधील योध्दा ठरुन समाज कार्यामधील नवदुर्गा ठरल्या आहेत मनस्वी घारे.
देवगड तालुक्यातील पाटथर-आसरोंडी गावातील मनस्वी घारे या गावच्या माहेर वाशिनी असून त्या उत्कृष्ट गायीका देखील आहेत. अनेक देशभक्तीपर गिते त्यांनी आपल्या गोड आवाजात सादर करुन रसिक श्रोत्यांनी मने जिंकत असताना त्यांनी प्रबोधनात्मक गितेही गायली आहेत.
सामाजिक बांधिलकी बांधून समाजामध्ये कार्य करण्याची त्यांची नेहमीच वाटचाल असते. घारे यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवूनही जिंकल्या आहेत. मात्र त्या कोणत्या पक्षातील आहेत. याला महत्व न देता तेथील जनतेने समाजसेविका म्हणूनच त्यांना निवडून दिले आहे.
सामाजिक बांधिलकीतून गेले कित्येक वर्षे घारे या सामाजिक कार्य करीत आहेत. शासनाच्या अनेक योजनांची माहिती तळागाळातील जनतेला देवून शासनाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना त्यांनी मिळवून दिला आहे. यामुळे त्या नेहमीच समाजसेवेचे व्रत हातात घेवून समाजाचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना विषाणूच्या कालावधीमध्ये गेले सहा महिने किंजवडे जिल्हा परिषद गटामधील प्रत्येक जनतेच्या घरी जावून त्यांच्या समस्या जाणून त्या स्वखर्चाने व त्यांना मदत करुन व कोरोना विषाणू रोखण्यासाठी देखील त्यांनी प्रबोधनात्मक काम केले आहे.त्यांनी रस्ते, पाणी, विज अशा अनेक मुलभूत समस्या मार्गी लावल्या आहेत. याबरोबरच महिलांना संघटित करण्याचे काम देखील त्यांनी केले आहे.
बचत गटांनाही मार्गदर्शन करुन त्यांना सहकार्य करुन स्वावलंबी बनण्याचा धडा दिला आहे. अशा त्यांच्या संघटन कौशल्याच्या बळावरती त्या ख-या अर्थाने समाजसेविका आहेत.
कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णांना सेवा दिली अशा शासकिय वैदयकिय अधिकरी अधिपरिचारीका,अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविकांचे रुन फेडणे हे समाजातील जनतेचे महत्वाचे काम आहे. याच उध्दार भावणेच्या दृष्टीकोनातून या पुढेही कोरोना विषाणूच्या महामारीच्या संघर्षात अशा व्यक्तींना नेहमीच आपण पाठबळ देणार आहोत.
- मनस्वी घारे
उद्योजिका (९४०३५६११७२)