Annapurna, Balutai Dhebe of the Corona period | Navratri 2020 : मी- दुर्गा : कोरोना काळातील अन्नपूर्णा, बाळूताई ढेबे

Navratri 2020 : मी- दुर्गा : कोरोना काळातील अन्नपूर्णा, बाळूताई ढेबे

ठळक मुद्दे Navratri 2020 : मी- दुर्गा : बाळूताई ढेबेकोरोना काळातील अन्नपूर्णा

प्रगती जाधव-पाटील

दल हा निसर्गाचा नियम; पण काही माणसं अपार कष्टाच्या जोरावर हा बदल स्वत:हून घडवून आणतात. कापील येथील बाळूताई ढेबे यांनीही मेहनतीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केलं. एकेकाळी मजुरी करणारी ही लुगड्यातील कष्टकरीन आज कित्येक एकराची ह्यमालकीणह्ण बनली. एवढचं नव्हे तर कोरोना काळात त्यांनी स्वत:च्या चार एकरातील भाजीपाला गावोगावी फिरून मोफत वाटला.

कापील येथील बाळूताई विठ्ठल ढेबे या अल्पशिक्षित. कुटुंबाची परिस्थिती जेमतेम. दिवसभर कष्ट केले तरच रात्रीची चूल पेटायची. पती-पत्नी रोजगारासाठी गावभर फिरायचे. मजुरी करायचे. मुले आनंदा आणि भाऊसाहेब यांनीही आई-वडिलांसोबत कष्ट उपसले. या कुटुंबाने विहिरीवर मजुरी केली.

भांगलण, खुरपणी केली. वीटभट्टीवर मजुरीही केली; पण परिस्थितीसमोर कधी हार मानली नाही. प्रत्येक संकटासमोर बाळूताई या भिंत बनून उभ्या राहिल्या. आणि अपार हाल सोशीत त्यांनी कुटुंबाला स्थैर्य मिळवून दिलं. ज्या शेतात त्यांनी मजुरी केली, त्या शेतासह आणखी कितीतरी शेती त्यांनी कमवली. मजुरी करणाऱ्या बाळूताई मालकीण बनल्या.

दिवस बदलले; पण बाळूताई बदलल्या नाहीत. आजही त्या पदर खोचून शेतात काम करतात. जनावरं सांभाळतात. आयुष्य बदललं तरी त्यांना जुन्या दिवसांचा विसर पडलेला नाही. त्यामुळेच कोरोनाच्या संकटात त्यांनी त्यांच्या तब्बल चार एकरातील भाजीपाला घरोघरी जाऊन मोफत वाटला. या भाजीपाल्यातून बाळूताई यांना लाखो रुपये कमावता आले असते; पण हे दिवस पैसे कमवायचे नाहीत. आपली माणसं जगावायचे हे दिवस आहेत, असं बाळूताई सांगतात.


परिस्थितीमुळे यापूर्वी कधी कुणासाठी काही करता आलं नाही. मात्र, कोरोना संकटात समाजासाठी काहीतरी करता आलं, याचंच बाळूताई ढेबे यांना मोठ्ठं समाधान आहे. अल्पशिक्षित असूनही त्यांच्या विचारांची श्रीमंती खरंच वाखाणण्याजोगी आहे.
-बाळूताई ढेबे,
शेतकरी
९९६०८६७४४४

Web Title: Annapurna, Balutai Dhebe of the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.