coronavirus : परभणी जिल्ह्यात नवीन पाच कोरोना रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 17:00 IST2020-07-14T16:56:54+5:302020-07-14T17:00:48+5:30
मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाला पाच संशयितांचे स्वब अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले

coronavirus : परभणी जिल्ह्यात नवीन पाच कोरोना रुग्णांची भर
परभणी : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २८८ झाली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गंगाखेड, पाथरी, सेलू, सोनपेठ या ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला असून, जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाला पाच संशयितांचे स्वब अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये परभणी शहरात एक, सोनपेठ तालुक्यातील भिसेगाव, पाथरी तालुक्यातील कानसूर येथे प्रत्येकी एक आणि सेलू तालुक्यातील वालुर येथे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळाली.