बोलेरो जीपच्या धडकेत तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 23:31 IST2020-03-19T23:31:23+5:302020-03-19T23:31:45+5:30
भरधाव बोलेरो जीपने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार ठार झाल्याची घटना पवनी ते लाखांदूर मार्गावर बोरगावजवळ गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

बोलेरो जीपच्या धडकेत तरुण ठार
भंडारा - भरधाव बोलेरो जीपने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार ठार झाल्याची घटना पवनी ते लाखांदूर मार्गावर बोरगावजवळ गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
अविष्कार हिरा तर्हेकार (१७) रा. कऱ्हांडला ता. लाखांदूर असे मृताचे नाव आहे. तो गुरुवारी काही कामानिमीत्त पवनी येथे गेला होता. काम आटोपून कऱ्हांडला येथे परत येत होता. रात्री ८ वाजताच्या सुमारास बोरगावजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो जीपने जबर धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.