ट्रॅक्टरखाली दबून तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:03 IST2017-12-14T01:02:58+5:302017-12-14T01:03:49+5:30

सिमेंटचे विद्युत खांब घेऊन बारव्हा गावाकडे जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे एक्सल तुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. यात ट्रॉलीमध्ये बसलेल्या २१ वर्षीय तरुणाचा ट्रालीखाली दबून जागीच करूण अंत झाला.

The young killed by a truck under the tractor | ट्रॅक्टरखाली दबून तरुण ठार

ट्रॅक्टरखाली दबून तरुण ठार

ठळक मुद्देतिरखुरी शिवारातील घटना : एक्सल तुटल्याने अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : सिमेंटचे विद्युत खांब घेऊन बारव्हा गावाकडे जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे एक्सल तुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. यात ट्रॉलीमध्ये बसलेल्या २१ वर्षीय तरुणाचा ट्रालीखाली दबून जागीच करूण अंत झाला. ही घटना काल रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान लाखांदूर तालुक्यातील किटाडीजवळील तिरखुरी शिवारात घडली. शुभम रुपचंद मेंढे (२१) रा.जैतपूर असे मृत युवकाचे नाव आहे.
या अपघातात राजकुमार भुरले व अनिल चौधरी हे दोघे किरकोळ जखमी झाले. शुभम हा तरुण लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षाला शिकत होता. शिकण्याबरोबर मिळेल त्या मजुरीच्या कामावर जात होता. घटनेच्या दिवशी शुभम हा ट्रॅक्टरवर सिमेंटचे विद्युत खांब आणण्यासाठी दवडीपार येथे गेला होता. त्यावेळी चालक नाना डोये, शुभम मेंढे, जयश्री भुरले व अनिल चौधरी हे चौघे होते. ट्रॉलीमध्ये १० सिमेंटचे खांब मांडण्यात आले. दरम्यान किटाडीपासून एक दिड कि.मी. वर तिरखुरी शिवारात ट्रॉलीचे एक्सल तुटल्याने चाक वेगळा झाला. क्षणातच खांबासहीत ट्रॉली उलटली. त्यात ट्रॉलीत बसलेल्या शुभम याच्या डोक्यावर सिमेंटचे खांब येऊन ट्रॉलीखाली सापडला. त्यात शुभमचा जागीच मृत्यू झाला.आले. शुभमच्या मागे आई, वडिल व एक लहान बहिण आहे. शुभमच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: The young killed by a truck under the tractor

टॅग्स :Accidentअपघात