प्रश्नपत्रिकेत विचारले चुकीचे प्रश्न
By Admin | Updated: March 6, 2015 01:03 IST2015-03-06T01:00:23+5:302015-03-06T01:03:58+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता १२ वी च्या गणित व राज्यशास्त्राच्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आल्याने ...

प्रश्नपत्रिकेत विचारले चुकीचे प्रश्न
तुमसर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता १२ वी च्या गणित व राज्यशास्त्राच्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. तज्ज्ञांकडून प्रश्नपत्रिका काढताना अशा चुका होतात, असा प्रश्न उपस्थित होतो.
१२ वी विज्ञान शाखेच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेत संदिग्ध प्रश्न विचारण्यात आले. यात प्रथम क्रमांक २ मधील बी उपप्रश्न ३ मध्ये सम गुणाकार व बेरीज एकासोबत करावयास सांगितले आहे. यामध्ये केवळ गुणाकारच पाहिजे. बेरीज नाही. या प्रश्नाचे उत्तर काढताच येत नाही. या प्रश्नावर चार गुण आहेत.
दुसरा प्रश्न क्रमांक ६ मधील उपप्रश्न अ मधील ३ मध्ये चार भागीला एक्स दिले आहे. यात अपूर्णांक संख्या नको. येथे ‘चार एक्स’ हवे. त्यामुळे उदाहरणाचे उत्तर निघत नाही. या प्रश्नावर तीन गुण आहेत. एकूण प्रश्नपत्रिककेत सात गुणांचे दोन प्रश्न संदिग्ध विचारण्यात आले.
कला शाखेच्या राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक तीन मध्ये भारतात एक प्रबळ पक्ष पद्धती नाकारली गेली आहे. चूक की बरोबर असा प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रश्नावर दोन गुण आहेत. प्रश्न क्रमांक ५ ‘अ’ मध्ये फरक स्पष्ट करा मध्ये धर्मनिरपेक्षता आणि वर्गवार असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर तीन गुण आहेत.
संदिग्ध प्रश्न विचारणे टाळावे असा शिक्षण मंडळाचा कटाक्ष आहे. परंतु दरवर्षी असे संदिग्ध प्रश्न विचारले जातात. वर्षभर संबंधित विषयाचे प्राध्यापक, तज्ज्ञ प्राध्यापकांच्या बैठका घेण्यात येतात हे विशेष. प्रश्नपत्रिकेतील त्रुटी व चुकांचे संदर्भातील सूचना नंतर सर्वच विभागीय शिक्षण मंडळातर्फे समीक्षक व परीक्षकांना देण्यात येऊन नंतर गुणदान योजनेअंतर्गत संदिग्ध प्रश्नांना पूर्ण गुणदान करण्याच्या सूचना करण्यात येते. परंतु विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर या प्रश्नांचा मोठा आघात होतो. (तालुका प्रतिनिधी)