शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या रेल्वे ट्रॅकचे काम सुरु झाले वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

 ब्रिटिशांच्या कार्यकाळात मुंबई- हावडा रेल्वे मार्गावर एका ट्रॅकचे काम केले होते. त्यानंतर भारत सरकारने दुसऱ्या रेल्वे ट्रॅकचे बांधकाम केले. गत पन्नास वर्षात या मार्गावर नवीन रेल्वे ट्रॅकचे बांधकाम झाले नव्हते. तीन वर्षांपासून मुंबई हावडा दरम्यान तिसरा रेल्वे ट्रॅक तयार करण्यात येत आहे. हावडापासून  कामाला सुरुवात झाली. रेल्वे ट्रॅकचे काम गोंदिया, तिरोडा, तुमसर दरम्यान सुरू आहे.

ठळक मुद्देसेमी हाय स्पीड गाड्या धावणार : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मुंबई - हावडा रेल्वेमार्गावर तिसऱ्या रेल्वे ट्रॅकचे काम गत काही महिन्यांपासून सुरू असून, आता या कामाने वेग घेतला आहे. आतापर्यंत या मार्गावर दोनच ट्रॅक अस्तित्वात असून, वाढत्या मालगाड्या व प्रवासी गाड्यांची संख्या बघता या मार्गावर रेल्वे प्रशासनाने तिसरा ट्रॅक करण्याचा निर्णय घेतला. सदर ट्रॅकवर सेमी हायस्पीड गाड्या धावणार असल्याची माहिती आहे. ब्रिटिशांच्या कार्यकाळात मुंबई- हावडा रेल्वे मार्गावर एका ट्रॅकचे काम केले होते. त्यानंतर भारत सरकारने दुसऱ्या रेल्वे ट्रॅकचे बांधकाम केले. गत पन्नास वर्षात या मार्गावर नवीन रेल्वे ट्रॅकचे बांधकाम झाले नव्हते. तीन वर्षांपासून मुंबई हावडा दरम्यान तिसरा रेल्वे ट्रॅक तयार करण्यात येत आहे. हावडापासून  कामाला सुरुवात झाली. रेल्वे ट्रॅकचे काम गोंदिया, तिरोडा, तुमसर दरम्यान सुरू आहे.या मार्गावर तिसऱ्या रेल्वे ट्रॅककरिता अनेक लहान-मोठे पूल बांधकाम करण्यात आले असून, तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीवर मोठा रेल्वे पूल बांधकाम अर्धेअधिक झाले आहे. केवळ लोखंडी स्पॉन तेवढे शिल्लक आहे. मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील तिसरा रेल्वे ट्रॅक सेमी हायस्पीड असल्याची माहिती आहे. या मार्गावर मालगाडीसोबतच प्रवासी गाड्यांची संख्या मोठी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला मालगाड्या वाहतुकीतून दरवर्षी विक्रमी कोट्यवधींचा महसूल प्राप्त होतो. हावडापर्यंत रेल्वेमार्ग असल्याने या मार्गावर प्रवासी गाड्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तिसरा रेल्वे ट्रॅक रेल्वे प्रशासनाने तयार करण्याचा निर्णय घेतला. पूर्वीचे दोन्ही रेल्वे ट्रॅक हे पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आले होते; परंतु तिसरा रेल्वे ट्रॅक तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन या मार्गाचे काम करण्यात येत आहे.

कामावर कोरोनाचे सावट सध्या विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रेल्वे ट्रॅकचे काम करणारे तांत्रिक कर्मचाऱ्यांसह काही स्थानिक मजूर येथे रेल्वे ट्रॅकचे काम करतात. तांत्रिक कर्मचारी हे परराज्यातील आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे ट्रॅकच्या बांधकामावर त्याचे परिणाम झाल्याचे दिसून येतात. मागील वर्षी रेल्वेच्या कामाला कोरोना वाढल्याचा फटका बसला होता. पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे रेल्वे ट्रॅकच्या कामाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :railwayरेल्वे