भंडारा येथे मॅग्नीज खाणीत कामबंद आंदोलन सुरूच; तब्बल २५० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:09 IST2026-01-22T19:04:43+5:302026-01-22T19:09:06+5:30

खासदारांनी दिला सात दिवसांचा अल्टिमेटम : कंत्राटी कर्मचारी म्हणतात, आम्हाला न्याय हवा

Work stoppage continues in manganese mine in Bhandara; Loss of Rs 250 crore | भंडारा येथे मॅग्नीज खाणीत कामबंद आंदोलन सुरूच; तब्बल २५० कोटींचे नुकसान

Work stoppage continues in manganese mine in Bhandara; Loss of Rs 250 crore

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर :
डोंगरी येथील भारत सरकारच्या अखत्यारितील ब्रिटिशकालीन खुल्या मॅग्नीज खाणीत कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही तीव्र झाले असून, खाण प्रशासन आणि कंत्राटदारांविरोधात कामगारांचा संताप शिगेला पोहोचला आहे. या आंदोलनामुळे अवघ्या दीड दिवसांत सुमारे २५० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आंदोलनस्थळी भेट देत खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी कामगारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खाण प्रशासनाला सात दिवसांच्या आत कंत्राटी कामगारांच्या सर्व मागण्या मंजूर करण्याचा अल्टिमेटम दिला. अन्यथा हा विषय थेट केंद्रीय इस्पात व खाण मंत्रालयाकडे मांडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. बुधवारी दुपारी खासदार पडोळे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर दुसऱ्या पाळीत कंत्राटी कामगार कामावर रुजू झाले. यावेळी मॅग्नीज खाणीचे एजंट यू, एम. भुजाडे तसेच डोंगरी येथील खाण व्यवस्थापक सुधीर पाठक उपस्थित होते.

दर पाळीत सुमारे ६४ कोटींचा महसूल

दीड दिवसांत २५० कोटींचा फटका बसला आहे. खाणीतून दररोज एका पाळीत सुमारे ६४ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र आंदोलनामुळे मागील दीड दिवसांत अंदाजे २५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, स्थानिक वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाही वरिष्ठ खाण अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

खाणीत शुकशुकाट

या अन्यायाविरोधात मंगळवारी पहिल्याच शिफ्टमध्ये खाणीत न जाण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. कंत्राटी असले तरी हे कामगार केंद्र सरकारच्या खाणीत जीव धोक्यात घालून काम करतात. त्यांना नियमानुसार वेतन व सुविधा न देणे ही अतिशय गंभीर व भयंकर बाब आहे," असे ठाम मत खासदार पडोळे यांनी व्यक्त केले. डोंगरी येथील या खुल्या मॅग्नीज खाणीत सध्या १००० ते १२०० कंत्राटी कामगार कार्यरत असल्याची माहिती आहे. निविदा पद्धतीने कंत्राटदार नेमले जात असले तरी, कामगार कायद्यांचे सर्रास उल्लंघन होत आहे. कंत्राटदारांची दादागिरी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

आंदोलन चिघळणार

दोन दिवसांपासून खाणीत आंदोलन सुरू आहे. मागण्यांची पूर्तता होत नसल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

१८ कामगार कामावरून कमी

गोबरवाही येथील स्थानिक कंत्राटदाराला ६ डिसेंबर २०२५ रोजी कंत्राटी कामगार पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले. मात्र या नव्या कंत्राटानंतर आधी कार्यरत असलेल्या १८ कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले, ज्यामध्ये हेल्पर, ऑपरेटर व चालकांचा समावेश आहे. संबंधित कंत्राटदाराकडे सध्या सुमारे ३१७ कामगार कार्यरत असल्याची माहिती आहे. डोंगरी येथील खाणीत सध्या ५ ते ६ कंत्राटदार कार्यरत असून, प्रत्येकाकडे २५० ते ३०० कामगार काम करीत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या नियमानुसार मिळणारे वेतन, सुरक्षा साधने व इतर मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे.

Web Title : भंडारा मैंगनीज खदान में कामबंदी जारी; ₹250 करोड़ का नुकसान

Web Summary : डोंगरी मैंगनीज खदान में ठेका श्रमिकों की कामबंदी जारी है, जिससे ₹250 करोड़ का राजस्व नुकसान हुआ। सांसद पडोले ने हस्तक्षेप किया, सात दिनों के भीतर समाधान की मांग की अन्यथा केंद्रीय मंत्रालय को मामला सौंपने की चेतावनी दी। आश्वासन के बाद काम फिर शुरू हुआ, लेकिन मुद्दे अनसुलझे हैं।

Web Title : Work Stoppage Continues at Bhandara Manganese Mine; ₹250 Crore Loss

Web Summary : A work stoppage by contract workers at Dongri manganese mine continues, causing ₹250 crore loss in revenue. MP Padole intervened, demanding resolution within seven days or escalation to the central ministry. Work resumed after assurances, but issues remain unresolved.