शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी गाजविली ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:25 IST

गावाचा विकास करणे आणि गावातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामसभांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देठाणा येथे महिलांची एकजूट : दारूबंदी करण्यासाठी महिला सरसावल्या

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : गावाचा विकास करणे आणि गावातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामसभांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने गावातील महिलांनी ठाणा ग्रामसभेत प्रथमच मोठ्या संख्येने हजेरी लावून न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करण्यासाठी प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर ठराव संमत करीत ग्रामसभा गाजविली. शेवटपर्यंत प्रश्न विचारत एकाही पुरूषांना बोलण्याची वेळ येऊ दिली नाही हे विशेष.एरव्ही ग्रामसभा म्हटले की, पहिली सभा कोरमअभावी तहकुब होते. पुढील तहकुब सभेत आपल्याच विचाराच्या दोनचार जणांना घेऊन तहकुब सभेत विविध कामांना मंजूर घेत असतात. ठाणा पेट्रोलपंप येथे यावेळी वेगळेच पाहावयास मिळाले. येथील महिला राजसत्ता आंदोलन समितीने चंग बांधून ग्रामसभेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले. त्यानुसार महिला सभागृहात उपस्थित झाले.प्रथम महिलांची सभा झाली. तिथे महिलांनी समस्या मांडल्या. त्यानंतर गावातील इतर नागरिक ग्रामसभेला उपस्थित झाले. सभागृह अपुरे पडल्याने ग्रामपंचायत आवारात सभा घेण्यात आली. यातही महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नवनिर्वाचित सरपंच सुषमा पवार या सभाध्यक्ष होत्या. विषयसुचीनुसार सभेला सुरुवात झाली.ग्रामपंचायतचे सन २०१८-१९ चे वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यात आले. शासकीय परिपत्रकाचे वाचन केले. यात जनसेवकाची निवड करण्यात आली. यातही महिलांनी बाजी मारली. येथे फरजाना शेख यांची निवड केली. ठाणा येथे कब्रस्तानकरीता जागा देण्याची मागणी संत नरहरी महाराज परिसराचे सौंदर्यीकरण करणे, नवीन आनंद बुद्ध विहार परिसराचा विकास करणे व दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. १.७० कोटी रूपयांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाची चौकशी करून योजना सुरू करा.सरपंचांनी घोषणापत्रात नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायततर्फे ५ रूपयांचे भोजन सुरू करण्यासंबंधी प्रश्नाचे उत्तर मागितले. सभाध्यक्ष व सचिवांना विकासात्मक बाबीवर धारेवर धरले. ठराव संमत करून घोषणा करण्यासाठी बाध्य केले. गावाच्या विकासासाठी महिला ग्रामसभेत सातत्याने आल्यास गावाचा चौफेर विकास होईल, असे महिला राजसत्ता आंदोलन समितीने म्हटले आहे.