सानगडी येथे महिला दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST2021-03-13T05:03:40+5:302021-03-13T05:03:40+5:30
उद्घाटन प्राचार्य डॉ. प्रकाश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. वंदना चवरे होत्या. प्रास्ताविक प्रा. डॉ. पू. ...

सानगडी येथे महिला दिन उत्साहात
उद्घाटन प्राचार्य डॉ. प्रकाश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. वंदना चवरे होत्या. प्रास्ताविक प्रा. डॉ. पू. रा. नंदेश्वर यांनी केले. दरम्यान, विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. चंदा पाखमोडे, उषा उपरीकर, मयूरी नंदागवळी, पल्लवी पोहनकर, सपना बडवाईक, काजल सुखदेवे, श्रद्धा वालोदे, आदी विद्यार्थ्यांनी जगातिक महिला दिन यावर आपले विचार व्यक्त केले. महिलांवरील कविता सादर केल्या. प्रा. डॉ. वंदना चवरे यांनी महिलांमधील कौशल्य विकसित करावे, निर्णय क्षमतेत सहभागी व्हावे, मिळालेल्या संधीचे सोने करून घ्यावे, महिलांनी सक्षम बनावे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. दीपा भिवगडे, प्रा. स्मिता टेंभूर्णी, प्रा. प्रियंका पोगडे, प्रा. कोचे उपस्थित होते. संचालन चैतन्या कापगते, तर आभार प्रदर्शन पवन भोयर यांनी केले.