अत्याचाराविरूद्ध महिलांनी नि:संकोचपणे तक्रारी कराव्यात
By Admin | Updated: December 6, 2014 22:41 IST2014-12-06T22:41:33+5:302014-12-06T22:41:33+5:30
आपल्या संस्कृतीत पुरूषांनी असे वागावे, असे वागू नये असे संस्कार बालपणापासून होत असतात. त्याच परिणामामुळे महिलांना दुय्यम लेखणारी पुरूषी मानसिकता तयार होते. यातूनच महिलांवर लैंगिक

अत्याचाराविरूद्ध महिलांनी नि:संकोचपणे तक्रारी कराव्यात
भंडारा : आपल्या संस्कृतीत पुरूषांनी असे वागावे, असे वागू नये असे संस्कार बालपणापासून होत असतात. त्याच परिणामामुळे महिलांना दुय्यम लेखणारी पुरूषी मानसिकता तयार होते. यातूनच महिलांवर लैंगिक अत्याचार व त्यांचे शोषण होत असते. त्यामुळे महिलांना या जाचातून न्याय मिळवून देणारा कायदा केंद्र शासनाने पारित केला आहे. त्याचा वापर करून् महिलांनी लैंगिक अत्याचार व शोषणाविरूद्ध नि:संकोचपणे तक्रारी कराव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले आहे.
महिलांवर होणारे अत्याचार आणि सुरक्षा याबाबत आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
या कार्यशाळेला न्यायाधीश आर.व्ही. डफरे, एम.एम. अलोणे, अॅड. मंजुषा गायधनी, मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. सुहास गजभिये, आर्ट आॅफ लिव्हींगच्या प्रशिक्षक हेमांगी देशमुख, युवा रूरल असोसिएशनच्या समुपदेशक मृणाल मुनीश्वर, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, उपजिल्हाधिकारी विजया बनकर उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. खोडे म्हणाल्या, अनेकदा कामाच्या ठिकाणी महिलांचे शोषण होते. तक्रार कुणाकडे करायची. अधिकारी पुरूष असल्यामुळे न्याय मिळण्याची खात्री महिलांना नसते. म्हणूनच महिलांचे लैगिंक अत्याचार २०१३ हा कायदा झाल्यामुळे महिलांना अत्याचाराविरूद्ध न्याय मिळू शकतो, असे सांगून या कायद्यानुसार भंडारा जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या अध्यक्षतेत ही समिती गठित करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांनी दबावात न येता समितीकडे तक्रार करावी, अशीच कार्यशाळा पुरूषांसाठी सुद्धा घेण्यात येईल आणि या कायद्याविषयी त्यांच्यामध्येसुद्धा जाणीवजागृती करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी अॅड. मंजुषा गायधनी म्हणाल्या, महिलांनी सतर्क असायला हवे. कायदा हा घटना घडून गेल्यावर वापरला जातो. मात्र घटना घडू नये यासाठी महिलांनी सतर्क असावे. महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे आवश्यक झाले आहे.
मृणाल मुनीश्वर म्हणाल्या, महिलांनी महिलांनी स्वत:वरील अत्याचार कधीच सहन करू नये. स्वसंरक्षणाचे काही उपाय यावेळी सांगितले. तसेच स्वानुभवाद्वारे महिलांना मार्गदर्शन केले. आॅर्ट आॅफ लिव्हींगच्या हेमांगी देशमुख यांनी हिंदू संस्कृतीत महिलांचे स्थान नेहमीच उच्च ठेवले आहे. स्त्रीला शक्ती स्वरूप संबोधले जाते. त्यामुळे महिलांनी स्वत:वरील शक्तीला जागृत करावे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे आणि शिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे उद्दीष्ट उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)