दीक्षा घेतल्याशिवाय बौद्ध होता येणार नाही
By Admin | Updated: February 9, 2016 00:35 IST2016-02-09T00:35:29+5:302016-02-09T00:35:29+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर बौद्ध धम्म स्विकारण्याचे जाहीर केले.

दीक्षा घेतल्याशिवाय बौद्ध होता येणार नाही
वरठी येथे धम्म प्रवचन : भंदत विमलकीर्ती गुणसारी यांचे प्रतिपादन
वरठी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर बौद्ध धम्म स्विकारण्याचे जाहीर केले. स्वत:ला बौद्ध म्हणून न वावरता सर्व प्रथम त्यांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. याचा सरळ अर्थ असा की बौद्ध धम्माची दिक्षा घेतल्याशिवाय बौद्ध होता येत नाही. डॉ.आंबेडकर यांच्यानंतर दिक्षा न घेता बौद्ध म्हणून वावरणाऱ्या अनाधिकृत बौद्धामुळे धम्माचा ऱ्हास होत आहे. यामुळे प्रत्येक अनुनायाने बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचे आवाहन भदंत विमलकीर्ती गुणसारी यांनी केले.
ते वरठी येथे आयोजीत धम्म प्रवचनात बोलत होते. ते म्हणाले, बौद्ध धम्मात त्रिशरण, पंचशिल यासारखे अंसख्य सुत्तपाठ फार पवित्र आहेत. त्याचे ग्रहण केल्याने माणुस शुद्ध होवून शिलवान बनू शकतो. जीवनात प्रत्येकांना दु:ख आहेत. त्या दु:खाचे निवारण करण्यासाठी दु:ख आहेत.
म्हणून चर्चा केल्याने होणार नाही. सामुहीक प्रयत्नाची आवश्यकता आहे. जाती द्वेष, मनुष्य भेद, उच्च विद्वता, वर्ण आणि जाती भेद हे माणुसकीला घातक आहेत. बौद्ध म्हणून वावरणारे पण अजूनही पुर्वाश्रमीचे कर्मकांड करू पाहणाऱ्याची संख्या फार मोठी आहे. जातीद्वेष नष्ट करण्यासाठी बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. बौद्ध धम्माची दीक्षा घेवून पंरपरागत सुरु असलेल्या जात दर्शक आडनाव बदलविणे आवश्यक आहे.
मानवी जीवनात चढाओढ, स्पर्धा असतात. यापासून कधी सुख तर कधी दुख: वाट्याला येतात. दुर्लक्षित समाजाच्या वाट्याला आजन्म दुख:च होते.
यापासून मुक्त करण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. गुलामगिरीतून मुक्त करून सर्वाना समान अधिकार संविधानातून दिले. दुर्बल घटकांना प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दीले. लढ्याच्या आधारावर प्राप्त झालेल्या सुविधांचा लाभ घेतला.परंतु खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना साथ देण्यात आली नाही.
पण बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नाही. बाबासाहेबांना देवाची उपमा दिली पण या देवाचे कुणी ऐकले नाही. त्यांनी उभारलेल्या लढ्याचे अस्तित्व नाकारण्याचे काम केले. स्वार्थी बनण्यापेक्षा दुसऱ्यांचे भले करा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलींद रामटेके, माजी जि.प. सदस्य दिलीप उके, किशोर बौद्ध, बुद्धकला फुले, शेखर मडामे, देवदास डोंगरे, कल्याण डोंगरे, शुंभागी गणवीर उपस्थित होते. संचलन रविद्र बोरकर व आभार विवेक गणवीर यांनी मानले. (वार्ताहर)