सभागृह हवेत बांधणार काय?

By Admin | Updated: July 21, 2014 00:02 IST2014-07-21T00:02:40+5:302014-07-21T00:02:40+5:30

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मौजा शहापूर येथील ग्राम सचिवालयाजवळ लागून असलेल्या परमात्मा एक सेवक मंडळ द्वारा अतिक्रमण करुन तयार करण्यात आलेल्या मानव मंदिराजवळ

Will the building be built in the air? | सभागृह हवेत बांधणार काय?

सभागृह हवेत बांधणार काय?

ग्राम पंचायतीचा ठराव कोणासाठी : सार्वजनिक सभागृहाकरिता जिल्हा नियोजन समितीचीही मान्यता
दिनेश भुरे - शहापूर
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मौजा शहापूर येथील ग्राम सचिवालयाजवळ लागून असलेल्या परमात्मा एक सेवक मंडळ द्वारा अतिक्रमण करुन तयार करण्यात आलेल्या मानव मंदिराजवळ सभागृह बांधकामास जिल्हा नियोजन समितीने प्रशासकीय मंजुरी दिली असली तरी हे स भागृह नेमके कुठे व कोणासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या जागेवर सभागृह बांधकाम करावयाचे आहे तिथे मुळात जागाच शिल्लक नाही. या भूखंडावरील जागा आधिच अतिक्रमण करुन गिळंकृत करण्यात आली आहे.
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा ने जिल्हा नियोजन समितीला सादर केलेल्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०१३-२०१४ च्या नवीन अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्याकरिता सादर केलेल्या दि. १० जानेवारी २०१३ च्या पत्रातील अनुक्रमांक १ नुसार मौजा शहापूर येथे मानव मंदिराजवळ सभागृहाचे बांधकाम करण्यासंबंधी ३ लक्ष नव्यान्नव हजार दोनशे दहा रुपयाचा प्रस्ताव सादर केला. त्याला जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी प्राप्त होऊन पुढील आदेशाकरीता सादर करण्यात आले.
सा.बां. विभागाने सादर केलेल्या प्रस्तावात ज्या जागेवर सभागृह बांधावयाचे आहे, ती जागा मुळात झुडपी जंगलाची असून सदर जागा शौचाकरीता व जनावरे चराईकरीता असल्याचे ७/१२ उताऱ्यावरुन दिसून येते.
प्रस्तावासोबत जोडलेल्या मौजा शहापूर येथील गट क्रमांक ४ मध्ये एकूण ०.०८ हे.आर. जागा असून खातेदार सरकार आहे.
त्यात झुडपी जंगल, गवत असा स्पष्ट उल्लेख आहे. गावठाणाला लागून असलेली ही मोक्याची जागा सध्या ग्रामपंचायतच्या ताब्यात असून तिथे नर्सरी, पशुुचिकित्सालय, अंगणवाडी केंद्र, ग्रामसचिवालयच्या इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. ह्यापैकी ग्रामसचिवालयालगत असलेल्या शिल्लक जागेवर परमात्मा एक सेवक मंडळाने अतिक्रमण करुन मानव मंदिराची (चर्चास्थळ) निर्मिती करण्यात आलेली होती.
काही वर्ष मानव मंदिर अस्तित्वात असेपर्यंत सदर जागेचा वापर सार्वजनिकरित्या परमात्मा एक सेवक मंडळाद्वारा वापरला जायचा.
आमदार निधी उपलब्ध होताना दिसताच सदर मानव मंदिर पाडण्यात आले. त्यानंतर मंडळातील आपसी मतभेद व ग्रामपंचायतचा हस्तक्षेप यात समन्वय साधला न गेल्यामुळे येणाऱ्या निधीची वाट न पाहता पुन्हा तिथे मानव मंदिर उभारण्याच्या स्थानिक परमात्मा एक सेवक मंडळच्या हालचाली सुरू झाल्या. सद्यस्थितीत बांधकाम प्राथमिक अवस्थेत असल्याची माहिती आहे.
मंजुरी प्राप्त प्रस्तावित सभागृह हे ग्रामपंचायतच्या अखत्यारित येणार असले तरी ते वास्तविक मानव मंदिर या चर्चास्थळाकरीता असल्याचे बोलले जाते. यापूर्वीच्या ग्रामपंचायत समितीने चर्चास्थळीच सभागृह बांधण्याचा ठराव घेतला होता. मात्र मध्यंतरी झालेल्या सत्तांतरामुळे नवीन ग्रामपंचायत समितीस हे मान्य नसल्याचे समजते.
प्रस्तावामध्ये शब्दरचना बदलली
ग्रामपंचायतने २४ जानेवारी २०११ च्या मासिक सभेमध्ये ठराव क्रमांक ११/२ नुसार सभागृह मिळण्याबाबद चर्चा करण्यात येऊन ग्राम सचिवालयाचे बाजूने परमात्मा एक सेवक मंडळ प्रार्थनास्थळी (अतिक्रमण करण्यात आलेल्या सरकारी जागेवर) आमदार महोदयाच्या स्थानिक विकास निधीतून सभागृह बांधण्यात यावे असे ठरले होते.
तसा प्रस्ताव आमदार यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यांच्या शिफारसीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावासह अंदाजपत्रक जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले. प्रस्तावात चर्चास्थळाऐवजी मानव मंदिराजवळ असा शब्दप्रयोग करण्यात आला. त्यामुळे सभागृह नेमके कुठे बांधणार याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

Web Title: Will the building be built in the air?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.