वनउपज तपासणी नाका मोकाट
By Admin | Updated: January 18, 2016 00:24 IST2016-01-18T00:24:25+5:302016-01-18T00:24:25+5:30
बपेरा राज्य मार्गावरील वन उपज तपासणी नाक्यावर सुविधांचा अभाव आहे. जीर्ण इमारतीमधून प्रशासकीय कारभार सुरू आहे.

वनउपज तपासणी नाका मोकाट
हरदोली येथील प्रकार : शौचालय, इमारतीची दुरवस्था, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
रंजित चिंचखेडे चुल्हाड
तुुमसर - बपेरा राज्य मार्गावरील वन उपज तपासणी नाक्यावर सुविधांचा अभाव आहे. जीर्ण इमारतीमधून प्रशासकीय कारभार सुरू आहे. यामुळे महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामे करतांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सिहोरा परिसरात वनाचे संरक्षणासाठी वनविभागाने कार्यालयाना मंजुरी दिली आहे. बपेरा गावात तुमसर बपेरा राज्य मार्गावर सहायक वनपरिक्षेत्रधिकारी कार्यालयाचे नव्याने पदे वाढविण्यात आली. ९५१ हेक्टर जागेत असणाऱ्या वन आणि जंगलाची सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. वन, जंगल आणि वन्य प्राण्यांची सुरक्षा करणारे कर्मचारी असुरक्षित असल्याचे दिसून येत आहेत.
तुमसर बपेरा राज्य मार्गावर हरदोली गावात वन विभागाचे वन उपज तपासणी नाका आहे. सहायक वन परिक्षेत्रधिकारी पद असून पाच बिट निर्माण करण्यात आली आहे. चुल्हाडडोह, पचारा व सोनेगाव गावचे नाव असणारे तीन बिट आहेत. सोनेगावच्या हद्दीत २८३ हेक्टर ०४ आर जागेत वनाचे राखीव क्षेत्र आहे. यामुळे स्वतंत्र तीन बिटगार्ड नियुक्त करण्यात आले आहे. या कार्यालयांतर्गत तपासणी नाका आहे. परंतु या नाक्यावर कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. याशिवाय पाच वनमजुरांची पदे रिक्त आहेत. या कार्यालयांतर्गत महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु प्रशासकीय कामे करताना या कर्मचाऱ्यांची धांदल उडत आहे.
प्रशासकीय कारभार करण्यात येणारी इमारत पुर्णत: जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात इमारतीत पाणी जमा होते. यामुळे महत्वपूर्ण दस्तऐवज ओलेचिंब होते. अनेक दस्तऐवजांची यामुळे नासाडी झाली आहे. जीर्ण इमारत असल्याने साप, विंचवाची रोजची भेट कर्मचाऱ्यांची होत आहे. यामुळे इमारत मध्ये जातांना भीती निर्माण आहे. दरवर्षी पावसाळ्यात इमारतीचा काही भाग कोसळत आहे. यामुळे या इमारतीत कुणी कर्मचारी वास्तव्य करीत नाही. याआधी सहायक वन परिक्षेत्रधिकारी पठाण हे वास्तव्य करीत होते. परंतु नंतर कुणी वास्तव्य करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. या कार्यालयात शौचालय व मुत्रीघर नाही.
कार्यालयात महिला कर्मचारी असताना सुविधा उपलब्ध करताना प्रशासन गंभीर नाही. भिंतीचे आडोसे मुत्रीघराची भुमिका बजावत आहेत. सुविधाअभावी प्रशासकीय कारभार करण्याची मानसिकता कर्मचाऱ्यांची दिसून येत नाही.
या नाक्यावर एकच कर्मचारी नियुक्त आहे. दरम्यान, या कार्यालय अंतर्गत आवारात जप्तीचे साहित्य ठेवण्यात आले आहे.