शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या कातडीचा सौदा करणारे नागपूरचे कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

तालुक्यातील खैरी पिंडकेपार येथे तीन महिन्यापूर्वी शेत कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह सोडून बिबट्याची शिकार करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या या घटनेची कुणालाही खबरबात नव्हती. दरम्यान आरोपींनी या कातड्यासाठी ग्राहकाचा शोध सुरु झाला. नागपुरच्या व्यक्तीशी संपर्क सुरु झाला. या शिकाऱ्यांनी कातडीची किंमत २० कोटी रुपये सांगितली होती. दरम्यान हा सौदा पाच लाख रुपयात झालाही होता.

ठळक मुद्देचौकशी कासवगतीने : साकोलीच्या खैरी पिंडकेपारचे प्रकरण

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : बिबट्याची शिकार करून कातडी विकण्याच्या प्रयत्नात जेरबंद झालेल्या सहा जणांनी नागपुरच्या व्यक्तीसोबत पाच कोटी रुपयात सौदा केला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा हा बेत हाणून पाडला. आता एवढ्या मोठ्या किमतीत बिबट्याचे कातडे खरेदी करणारे नागपुरचे ते कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांकडून हा तपास वनविभगाकडे गेल्याने अतिशय संथ गतीने सुरु आहे.तालुक्यातील खैरी पिंडकेपार येथे तीन महिन्यापूर्वी शेत कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह सोडून बिबट्याची शिकार करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या या घटनेची कुणालाही खबरबात नव्हती. दरम्यान आरोपींनी या कातड्यासाठी ग्राहकाचा शोध सुरु झाला. नागपुरच्या व्यक्तीशी संपर्क सुरु झाला. या शिकाऱ्यांनी कातडीची किंमत २० कोटी रुपये सांगितली होती. दरम्यान हा सौदा पाच लाख रुपयात झालाही होता. परंतु स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांना गोपनीय खबर मिळाली. त्यांनी वेशांतर करून आणि सापळा रचून सहा जणांना जेरबंद केले. यानंतर या प्रकरणाचा तपास वनविभागाकडे देण्यात आला.वनविभागाने या सहा जणांची वन कोठडी मिळविली आहे. मात्र तीन दिवसात तपास पुढे सरकला नाही. शिकाऱ्यांनी नागपुरच्या व्यक्तींशी संपर्क साधला होता. मोबाईलवरूनच त्यांनी संपर्क साधला असावा त्यामुळे आरोपींचे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. पाच कोटी रुपयात कातडे खरेदी करणारे व्यक्ती गर्भश्रीमंत असण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या टोळीसाठी ही मंडळी काम करीत असावी असा संशय आहे.बिबट्याच्या नखांचा थांगपत्ता नाहीशिकाºयांजवळून पोलिसांनी बिबट्याची कातडी, जबडा जप्त केला. मात्र अद्यापही बिबट्याच्या नखांचा थांगपत्ता नाही. या नखांची विक्री तर झाली नाही ना अशा संशयही व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे शिकार नेमकी कोणत्या ठिकाणी झाली. याचा तीन दिवसात उलगडा करता आला नाही. सहाही आरोपी १५ जुलैपर्यंत वन कोठडीत आहेत. मात्र तीन दिवसात त्यांच्याकडून पुरेशी माहिती घेण्यास वनविभागाला यश आले नाही. तसेच यापुर्वी त्यांनी कुठे शिकार केली का? याचाही शोध घेण्याची गरज आहे.

टॅग्स :leopardबिबट्या