चांदपूर तलावावर कुणाची एकाधिकारशाही?

By Admin | Updated: May 4, 2017 00:25 IST2017-05-04T00:25:53+5:302017-05-04T00:25:53+5:30

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा आहे. तुमसर तालुक्यातील चांदूपर तलाव हा जिल्ह्यातील क्रमांक दोनचा तलाव आहे.

Who is the monopoly on Chandpur lake? | चांदपूर तलावावर कुणाची एकाधिकारशाही?

चांदपूर तलावावर कुणाची एकाधिकारशाही?

मासेमार कंत्राटावर प्रश्नचिन्ह : संबंधित विभागाचे दुर्लक्ष

मोहन भोयर तुमसर
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा आहे. तुमसर तालुक्यातील चांदूपर तलाव हा जिल्ह्यातील क्रमांक दोनचा तलाव आहे. तलावाची देखभाल व नियंत्रणाकरिता स्वतंत्र कार्यालय अस्तित्वात आहे. मागील अनेक वर्षापासून तलावात मासेमारीचे कंत्राट एकाच संस्थेकडे येथे जाते. तलावात विना परवानगीने बोटींग केली जाते. संबंधित विभागाची यास परवानगी नाही. चांदपूर तलावावर एकाधिकारशाही कुणाच्या आर्शिवादाने सुरू आहे. हा संशोधनाचा विषय आहे.
सातपुडा पूर्वत रांगात विस्तीर्ण परिसरात चांदपूर येथे जिल्ह्यातील दोनचा मोठा तलाव आहे. सिहोरा परिसरात सिंचन करणारा एकमेव तलाव असून सोंड्या उपसा सिंचन योजनेतून या तलावात पाणी उपसा दरवर्षी केले जाते. भर उन्हाळ्यातही या तलावात पाणी साठा उलपब्ध राहतो. सध्या या तलावात सुमारे ६ ते ८ टक्के जलसाठा आहे. पावसाळ्यात व हिवाळयात जिथवर नजर जाते तिथपर्यंत पाणीच पाणी येथे दिसते. राज्य शासनाने तालवाच्या देखरेख व नियंत्रणाकरिता स्वतंत्र कर्मचारीवर्ग येथे नियुक्त केले आहे. हे विशेष.
या तलावात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. मासेमारीला येथे मोठे वाव आहे. उन्हाळ्यात तलावात शेती लागवड केली जाते. सध्या टरबुजाची शेती येथे करण्यात आली आहे. चार ते पाच गावचे नागरिक मासेमार बांधव येथे शेती करतात. शेती करण्याकरिता त्यांनी तुमसर येथील चांदपूर तलाव प्रकल्प कार्यालयातून परवानगी घेतली आहे. त्यांनी महसूल सुद्धा असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
मासेमारी करण्याकरिता निविदा प्रक्रिया येथे राबविली जाते. प्रत्येक वेळी काही ठराविक मासेमारी करणाऱ्या संस्थेलाच येथे मासेमारीचे नियमीत कंत्राट येथे मिळत असल्याची माहिती आहे. भंडारा जिल्ह्यात केवळ तीन तलावात मासेमारीकरिता स्वतंत्र निविदा काढली जाते. अशी माहिती आहे. विशेषत: मत्स्य संघ हा मोठा आहे. मस्त्य संघाकडे भंडारा जिल्ह्यातील अनेक तलाव वर्ग करण्यात आल्याचे समजते. वारंवार एकाच मत्स्य संघाला कंत्राट का मिळत आहे हा संशोधनाचा विषय आहे.

‘बोटींग’चा अवैधरित्या व्यवसाय
या तलावात एक लहान बोट आहे. डिझेलवर ही बोट चालते. स्थानिक काही जण येथे अवैध बोटींग करीत आहेत. चांदपूर देवस्थान असल्याने येथे भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात. तलावाकडे भ्रमंतीकरीता ते जातात. पर्यटकांना मोह आवरता येत नाही अवैध बोटींगचा व्यवसाय मागील अनेक महिन्यापासून सर्रास सुरू आहे. सध्या जलसाठा कमी झाल्याने तो मंदावला आहे. दरवर्षी बोटींग मधून येथे कमविणे सुरू आहे. रेस्कू पथक येथे नाही. बोटींगचे नियम येथे पायी तुडविले जातात. धोक्याची शक्यता येथे नक्कीच आहे. बोटींगला येथे कुणाची आशिर्वाद आहे हा खरा प्रश्न आहे. आर्शिवादाशिवाय ते शक्य नाही. नागपूर येथील मुख्य कार्यालयात बोटींग करण्याकरिता परवानगीचे पत्र संबंधिताने दिल्याचे समजते.

चांदपूर तलाव टरबुज शेतीचे महसूल नियमानुसार भरण्यात आले. मासेमारीची प्रक्रिया मत्स्यविभागाकडून केली जाते. बोटींगची परवानगी या तलावात नाही. नागपूर येथून मुख्य कार्यालयातून ती प्राप्त होते. मार्च महिन्यात मी रूजू झालो आहे. यापुढे येथे नियमानुसार कारवाई केली जाईल.
-जे.आर. हटवार, उपविभागीय अभियंता चांदपूर प्रकल्प तुमसर.
चांदपूर तलावात मासेमारीची निविदा काढण्यात येते. जिल्ह्यात तीन तलावांची निविदा काढली जाते. निविदेअंतर्गत मासेमारीचे कंत्राट प्राप्त होते. बोटींगची परवानगी नागपूर कार्यालयातून नियमानुार प्राप्त होते. नियमबाह्य कामे केल्यावर निश्चितच कारवाई केली जाते.
-विश्वभंर पसारकर, प्रभारी मत्स्य उपआयुक्त भंडारा.

Web Title: Who is the monopoly on Chandpur lake?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.