शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

५०० रुपयांची लाच घेताना तलाठ्यासह इसमाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 00:14 IST

सातबाऱ्यावर १ लक्ष रुपयांचा बोझा चढविण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यासह एका इसमाला रंगेहात पकडण्यात आले.

विरली येथील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईभंडारा : सातबाऱ्यावर १ लक्ष रुपयांचा बोझा चढविण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यासह एका इसमाला रंगेहात पकडण्यात आले. मुरलीधर शेंडे असे या तलाठ्याचे नाव असून रविंद्र प्रल्हाद बोरकर असे अन्य इसमाचे नाव आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. येथे सोमवारी केली. तक्रारकर्ता हे किरमटी येथील रहिवासी असून त्यांच्या वडीलांच्या नावावर गटक्रमांक ३८६/१ कऱ्हांडला येथे साझा क्रमांक १६ या त्यांच्या मालकीच्या शेतीवर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय, वित्त आणि विकास महामंडळ यांच्या कार्यालयातर्फे दुग्ध व्यवसायासाठी १ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदर शेतीच्या सातबाऱ्यावर १ लाख रुपयांचा बोझा चढविण्यासाठी तक्रारदार यांनी विरली बुज. येथील तलाठी मुरलीधर शेंडे यांच्याशी संपर्क साधला. या संदर्भात अर्जही सादर केला. सातबारावर नोंद करण्यासाठी शेंडे यांनी ५०० रुपयांची लाच मागितली. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांच्याकडे तक्रार नोंदविली. सोमवारी सापळा रचून तलाठी मुरलीधर शेंडे व रविंद्र बोरकर यांना ५०० रुपयाची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.लाखांदूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, संजय कुरंजेकर, गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, कोमल बनकर, श्रीकांत हत्तीमारे, रसिका गंगाने, मनोज चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)