शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

'त्या' पुलाचे बांधकाम कधी होणार?

By admin | Updated: January 8, 2016 01:01 IST

पहेला ते गोलेवाडी रोड नाल्यावरील १५ ते २० वर्षापासून पुलाचे बांधकाम व त्यापुढील रस्ता दुरूस्तीचा प्रश्न प्रलंबित आहे.

बांधकाम रखडले : पहेला ते गोलेवाडी मार्गावरील प्रकारभंडारा : पहेला ते गोलेवाडी रोड नाल्यावरील १५ ते २० वर्षापासून पुलाचे बांधकाम व त्यापुढील रस्ता दुरूस्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याकरिता संबंधित विभागासी विविध प्रकारचा पत्रव्यवहार, निवेदने, ठराव आदी सर्व प्रकारचे दस्तऐवज सादर केल्यानंतरही त्याकडे हेतुपरस्पद दुलर्क्ष केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत संबंधित विभागाशी विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देवून वेळ काढून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर काम सुरू करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग व गोसे खुर्द विभाग या दोन्ही विभागाचे योग्य ताळमेळ जुळत नसल्यामुळे कामसुरू करण्यासाठी अडसर निर्माण होत असल्याचे सर्व स्तरावरून बोलल्या जात आहे. काम सुरू करण्यासंदर्भात दोन्ही विभागामार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण असून सुद्धा काम सुरू करता येत नसल्याचे सांगितले जात आहे. सदर पुलाचे बांधकाम व त्यापुढील रस्ता दुरूस्तीसाठी सदर मार्गाने गोलेवाडी, मिन्सी, पन्नासी, लहानमिन्सी, येटेवाही, तिर्री आदी गावावरून नागरिक येणे जाणे करतात. पहेला हीच परिसरातील मोठी बाजारपेठ असल्यामुळे व्यापाऱ्यांना खूप आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तसेच पहेला येथे शैक्षणिक केंद्र असल्यामुळे विद्यार्थ्यांना जाण्या येण्यास अडचण निर्माण होत आहे. रस्त्यावरून जाता येताना अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. रात्रीच्या वेळेस जाण्या येण्यास नागरिकांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर नाल्याला पूर आल्यानंतर ४-४, ५-५ दिवस रस्ता बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच व्यापारी वर्गाला सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून प्रलंबित पुलाचे बांधकाम व त्यापुढील रस्ता दुरूस्तीचे काम येत्या १० दिवसात तत्काळपणे सुरू करण्यासंदर्भात गोलेवाडी व मिन्सी ग्रामपंचायतच्या वतीने उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांना निवेदन देण्यात आले. सोबतच तत्काळपणे सुरू काम न केल्यास गोलेवाडी, मिन्सी, पन्नासी, लहानमिन्सी, येटेवाही, तिर्री इत्यादी येथील सर्व नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा सुद्धा देण्यात आला असलेला तरी सदर पुलाचे बांधकाम व त्यापुढील रस्ता दुरूस्तीचे काम कधी होणार, असा प्रश्न पडलेला आहे. (प्रतिनिधी)